
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सनातन धर्म म्हणजे डेंगी, मलेरिया, एचआयव्ही एड्स. त्याचे ताबडतोब निर्मूलन केले पाहिजे, अशा शब्दांत सनातन धर्माचा अपमान करणाऱ्या तामिळनाडूचा मंत्री उदयनिधी स्टालिन यांना सुप्रीम कोर्टाने सणसणीत चपराक हाणली आहे.You’re not a layman’: SC pulls up Udhayanidhi Stalin over ‘Sanatan Dharma’ remark
तुम्ही सामान्य व्यक्ती नाही. तुम्ही मंत्री आहात. आपण काय बोलतो??, त्याचा समाजावर काय परिणाम होईल??, याची जाणीव तुम्हाला पाहिजे. तुम्ही राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर करून सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेतलीत, पण तुम्ही बेलगाम वक्तव्य करून घटनेनेच दिलेल्या अधिकाराचीच पायमल्ली केलीत, अशा तिखट शब्दांमध्ये सुप्रीम कोर्टाने उदयनिधी स्टालिन यांना खडसावले.
तामिळनाडूतील एका पुरोगामी संघटनेच्या कार्यक्रमात उदयनदी स्टालिन यांनी सनातन धर्माला शिव्या दिल्या होत्या. सनातन धर्म म्हणजे डेंगी, मलेरिया, एचआईव्ही एड्स सारखा रोग आहे. आपण या रोगांचे जसे निर्मूलन करतो, त्या पद्धतीनेच सनातन धर्माचे निर्मूलन करावे, असे बेलगाम वक्तव्य उदयनिधी स्टालिन यांनी केले होते.
त्यानंतर उदयनिधीविरोधात संपूर्ण देशभर प्रचंड संताप उसळला होता. उदयनिधी स्टालिन वर खटला दाखल झाला. उदयनिधी यांनी स्वतःच्या बचावासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्या खटल्यावर सुनावणी घेताना न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांनी उदयनिधी स्टालिन यांनाच परखड बोल सुनावले.
तुम्ही सर्वसामान्य व्यक्ती नाही. तुम्ही एका राज्यातले मंत्री आहात. आपण काय बोलतो??, त्याचे समाजावर काय दुष्परिणाम होतील??, याची जाणीव तुम्हाला पाहिजे. तुम्ही घटनेच्या 32 व्या कलमाचा वापर करून न्यायालयाचा दरवाजा ठोठावलात, पण तुम्ही बेलगाम वक्तव्य करून “फ्रीडम ऑफ स्पीच” या घटनेच्या 19 (अ) आणि 25 व्या कलमाच पायमल्ली केली आहे, अशा परखड शब्दांमध्ये दोन्ही न्यायमूर्तींनी उदयनिती स्टालिन यांना खडसावले. न्यायमूर्तींनी या केसची पुढची सुनावणी 15 मार्चला ठेवली आहे.
You’re not a layman’: SC pulls up Udhayanidhi Stalin over ‘Sanatan Dharma’ remark
महत्वाच्या बातम्या
- दिल्ली लोकसभेसाठी बांसुरी स्वराज, मनोज तिवारी यांच्यासह 4 नव्या चेहऱ्यांना तिकीट; दिल्लीत पाच जागांवर भाजपचे उमेदवार
- भाजपच्या पहिल्या यादीत एक मुस्लिम उमेदवार, जाणून घ्या कोण आहेत अब्दुल सलाम, केरळमध्ये लढवणार निवडणूक
- भारतीय ॲप्स हटवण्याची तयारीत असलेल्या गुगलला दणका, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सुनावले
- हिंद महासागरात चीनला भारताचे चोख उत्तर; मॉरिशसमध्ये भारतीय तळ तयार