काश्मीरमधून युवक student – tourist visa वर पाकिस्तानात जाऊन दहशतवादी बनतात; अशा 17 दहशतवाद्यांना मारले; काश्मीरच्या पोलीस प्रमुखांनी केली पोलखोल

वृत्तसंस्था

श्रीनगर : जम्मू – काश्मीरमधून student visa व्हिसावर किंवा tourist visa वर काही लोक गेले तिथे राहिले आणि दहशतवादी बनून भारतात परत आले. अशा 57 केसेस सापडल्या आहेत. त्यापैकी 17 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे, अशी धक्कादायक माहिती काश्मीरचे पोलीस प्रमुख दिलबाग सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली.Young people from Kashmir go to Pakistan on student-tourist visa and become terrorists; Killed 17 such terrorists; Kashmir Police Chief Kelly Polkhol

आत्तापर्यंत घुसखोरीच्या माध्यमातून तसेच मानवी तस्करीच्या माध्यमातून दहशतवादी घडविण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न उघड करून ते फोल ठरविण्यात आले होते. परंतु, आता पाकिस्तानमध्ये अधिकृतरीत्या कागदपत्रे बनवून विद्यर्थी व्हिसा किंवा टुरिस्ट व्हिसा घेऊन तिकडे गेले आणि तिथे दहशतवादाचे ट्रेनिंग घेऊन वेगवेगळ्या दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेले असे काही लोक युवक आढळले आहेत, असे त्यांनी सांगितले.



दिलबाग सिंग म्हणाले की, अशा 57 केसेस समोर आल्या आहेत. त्यापैकी १७ दहशतवाद्यांना चकमकीत पोलिसांनी किंवा भारतीय सैन्य दलाने मारले आहे. १७ जण अजून परत आलेले नाहीत. ते पाकिस्तानातच लपले आहेत, तर उरलेले 13 जण हे जम्मू-काश्मीरमध्ये वेगवेगळ्या कारवायांमध्ये गुंतलेले आहेत. या सगळ्यांची ओळख जम्मू-काश्मीर पोलिसांनी पटवलेली आहे. लवकरच त्यांना पकडण्याची किंवा योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही दिलबाग सिंग यांनी दिली.

स्टुडंट किंवा टुरिस्ट व्हिसावर पाकिस्तानात जाण्याची संख्या वाढत असेल, तर या व्हिसांवर बंधने आणली पाहिजेत. तशी बंधने गेल्या काही दिवसांमध्ये आणली त्यावर प्रसारमाध्यमांमधून टीकाटिप्पणी झाली. परंतु, जर अशाप्रकारे अधिकृत कागदपत्रांचा गैरवापर करून काश्मिरी युवक पाकिस्तानात जात असतील तिथे शिक्षण घेण्याऐवजी दहशतवादाचे प्रशिक्षण घेत असतील तर त्यावर नक्की विचार केला पाहिजे आणि बंधन आणले पाहिजे.

पाकिस्तानात शिक्षणाच्या नावाखाली पेन, लॅपटॉप देण्याऐवजी विद्यार्थ्यांना बंदुका देत असतील तर भारताकडे ही त्याचे सडेतोड उत्तर असेल. त्या दहशतवाद्यांना त्यांच्याच कठोर भाषेत उत्तर दिले जाईल, असे ते म्हणाले.

Young people from Kashmir go to Pakistan on student-tourist visa and become terrorists; Killed 17 such terrorists; Kashmir Police Chief Kelly Polkhol

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात