
वृत्तसंस्था
न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. जिथे त्यांनी UN मुख्यालयात योग दिनाच्या कार्यक्रमात भाग घेतला आणि देशवासियांना संबोधितदेखील केले. त्यानंतर त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेतली. यानंतर पंतप्रधान मोदी दुसऱ्यांदा अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणार आहेत. या संबोधनावर अमेरिकी काँग्रेसच्या दोन सदस्यांनी बहिष्कार घातला आहे, ज्यात रशिदा तलेब आणि इल्हान उमर यांचा समावेश आहे. दोन्ही खासदारांनी पंतप्रधान मोदींवर अल्पसंख्याकांच्या अधिकारांचे हनन केल्याचा आरोप केला. याला आता भारतातील मुस्लिम नेत्याने प्रत्युत्तर दिले आहे.’You are showing a wrong picture of my India…’ Muslim leader’s reply to US MP boycotting PM Modi’s speech
पीएम मोदींच्या भाषणावर बहिष्कार
अमेरिकन खासदार इल्हान उमर यांनी एक ट्विट केले होते, ज्यामध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींच्या भाषणाला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले होते. त्यांनी लिहिले होते की, “पीएम मोदींच्या सरकारने धार्मिक अल्पसंख्याकांवर दडपशाही केली आहे, हिंसक हिंदू राष्ट्रवादी संघटनांना ढिल दिली आहे आणि पत्रकार/मानवाधिकार वकिलांना लक्ष्य केले आहे. म्हणूनच मी मोदींच्या भाषणाला उपस्थित नाही.”
I belong from religious Minority Of India but I live freely with my religious freedom and religious identity in Prime Minister Narendra Modi's India, I have equal share in every resource here, I have the freedom to speak whatever I want in India.
I also have the freedom to write… https://t.co/Op2f7W95OS— Atif Rasheed (Modi Ka Parivar) (@AtifRasheed80) June 21, 2023
मुस्लिम नेत्याचे प्रत्युत्तर
या ट्विटवर अल्पसंख्याक आयोगाचे माजी उपाध्यक्ष आतिफ रशीद यांनी अमेरिकन खासदाराला प्रत्युत्तर दिले. त्यांनी इल्हान उमरला विषारी प्रचार थांबवण्यास सांगितले. रशीद यांनी लिहिले की, “मी भारतातील धार्मिक अल्पसंख्याक समुदायाचा आहे, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भारतात मी माझे धार्मिक स्वातंत्र्य आणि धार्मिक ओळख घेऊन मुक्तपणे जगतो, येथील प्रत्येक संसाधनात माझा समान वाटा आहे. मला हवे ते बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. भारत मला हवे ते लिहिण्याचे स्वातंत्र्य आहे. मला सांगताना खेद वाटतो की तुम्ही तुमच्या द्वेषाच्या अजेंड्याखाली माझ्या भारताचे चुकीचे चित्र दाखवत आहात. तुमच्या तोंडातून विष ओकणे बंद करा.”
अमेरिकेचे खासदार रशिदा तलेब आणि इल्हान उमर यांनी यापूर्वीही पंतप्रधान मोदी आणि भारताविरोधात वक्तव्ये केली आहेत. 2018 मध्ये दोघेही अमेरिकन काँग्रेसमध्ये गेले. इल्हान उमर याआधी पाकिस्तान दौऱ्यावर असताना चर्चेत आल्या होत्या. यादरम्यान त्या पीओकेमध्येही गेल्या होत्या.
‘You are showing a wrong picture of my India…’ Muslim leader’s reply to US MP boycotting PM Modi’s speech
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या संयुक्त राष्ट्र संघात गिनीज बुकात वर्ल्ड रेकॉर्ड!!
- Manipur Violence : अमित शाह यांनी मणिपूर हिंसाचार संदर्भात बोलावली सर्वपक्षीय बैठक
- पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात ‘UN’ मुख्यालयात आयोजित ‘योग’ सत्राने घडवला जागतिक विक्रम!
- रॅपर हनी सिंगला गोल्डी बराडकडून जीवे मारण्याची धमकी!