नाशिक : सन 2022 मध्ये होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज झाली. यामध्ये सर्वात महत्त्वाचा असा राजकीय ठराव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मांडला. त्याला तामिळनाडूचे भाजप प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांनी अनुमोदन दिले, तर त्यावर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, अनुराग ठाकूर, जी. किशन रेड्डी, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे नेते बोलले. Yogi presented a political resolution in the BJP National Executive; The work of Savarkar brothers will be honored
त्यानंतर राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीची माहिती देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत सीतारामन यांना योगी आदित्यनाथ यांनी राजकीय ठराव का मांडला?, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर निर्मला सीतारामन यांनी का नाही?, योगी आदित्यनाथ हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. उत्तर प्रदेशात सारखे सर्वात मोठे राज्य ते सक्षम पणे चालवतात, असे प्रत्युत्तर दिले. योगी सरकारने उत्तरप्रदेशात चालविलेल्या विविध योजनांची निर्मला सीतारमण यांनी स्तुती केली आणि उत्तर संपविले.
पण या प्रश्नाचे योगी आदित्यनाथ यांनी राजकीय ठराव का मांडला? किंवा त्यांना भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने राजकीय ठराव मांडण्याची संधी का दिली?, या प्रश्नाचे उत्तर एका प्रदेशाचे मुख्यमंत्री एवढ्याच अर्थाने मर्यादित नाही. तर ते उत्तर भाजपची पुढची पिढी आता निर्णायक स्थितीमध्ये मध्ये येत असल्याचे निदर्शक आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जे. पी. नड्डा, पियुष गोयल हे याच प्रक्रियेतून पुढे आलेले नेते आहेत.
योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेश सारखे मोठे राज्य चालवतात या उत्तरात काही मोठे रॉकेट सायन्स दडलेले नाही. पण भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण नेमके काय होते याकडे सगळे लक्ष लागलेले असताना तसेच त्यांचे भाषण हाच भाजप कार्यकर्त्यांसाठी आदेश आणि मोदी मंत्री असताना त्याखालोखाल महत्वाचा असा राजकीय ठराव योगी आदित्यनाथ यांनी मांडणी याला भाजप अंतर्गत राजकीय दृष्ट्या अधिक महत्त्व आहे. पक्ष दीर्घ काळाची वाटचाल करत असताना अशाच स्वरूपाने नेतृत्वाची पेरणी करत असतो, हे यातून दिसून येत आहे.
योगी आदित्यनाथ यांनी मांडलेल्या राष्ट्रीय राजकीय ठरावात फक्त उत्तर प्रदेश यापुरते विषय केंद्रित नाहीत, तर संपूर्ण देशाला लागू असणारे 18 मुद्द्यांचा यामध्ये समावेश आहे. हे सगळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे महत्वाचे मुद्दे आहेत. या राजकीय ठरावाला अनुमोदन देणारे नेते देखील देशाच्या सर्व दिशांमधल्या राज्यांचे प्रतिनिधी आहेत. हे सर्व नेते प्रथमच राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत राजकीय ठरावावर बोलताना दिसले आहेत. हा महत्त्वाचा बदल भाजपमध्ये घडताना दिसतो आहे आणि तो खऱ्या अर्थाने टिपण्याची गरज आहे.
योगी आदित्यनाथ यांनी मांडलेला राजकीय ठराव याकडे फक्त उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मर्यादित अर्थाने पाहणे राजकीयदृष्ट्या चूक ठरणार आहे. त्या पलिकडे जाऊन योगी आदित्यनाथ यांच्या “नेतृत्व भविष्य पेरणीकडे” पाहण्याची गरज आहे. एवढेच नाही तर या राजकीय ठरावावर बोलण्याची संधी देण्यात आलेल्या नेत्यांची देखील ही “नेतृत्व भविष्य पेरणी” आहे आणि ती भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने दाखवून दिलेली आहे…!!
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App