वृत्तसंस्था
लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भाजपने मथुरेतून तिकीट द्यावे म्हणजे ते मथुरेतून निवडणूक लढवून पुन्हा मुख्यमंत्री बनतील, अशा आशयाचे पत्र भाजपचे राज्यसभेचे खासदार हरनाथ सिंह यादव यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पाठविले आहे. Yogi mocks Akhilesh Yadav for contesting from Mathura !!; Said …
योगी आदित्यनाथ हे मथुरेतून निवडणूक लढविण्याची शक्यता निर्माण होताच त्यांची माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी खिल्ली उडवली आहे. भगवान श्रीकृष्ण रोज रात्री माझ्या स्वप्नात येतात आणि ते मला सांगतात की उत्तर प्रदेशात लवकरच समाजवादी पक्ष सरकार स्थापन करणार आहे, अशा शब्दांमध्ये अखिलेश यादव यांनी योगी आदित्यनाथ यांच्या मथुरेतून निवडणूक लढवण्याचा कल्पनेची खिल्ली उडवली आहे. हरनाथ सिंग यादव यांनी आपल्या पत्रामध्ये भगवान श्रीकृष्णाने आपल्याला प्रेरणा दिल्याने आपण ते लिहीत आहोत असा उल्लेख केला आहे. या उल्लेखातूनच अखिलेश यादव यांनी योगी आदित्यनाथ यांच्या मथुरेतून निवडणूक लढविण्याचा संकल्पनेची खिल्ली उडवली आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
#WATCH | "Lord Sri Krishna comes to my dream every night to tell me that our party is going to form the government,” said Former UP CM and Samajwadi Party chief Akhilesh Yadav yesterday pic.twitter.com/rmq1p8XgwT — ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 4, 2022
#WATCH | "Lord Sri Krishna comes to my dream every night to tell me that our party is going to form the government,” said Former UP CM and Samajwadi Party chief Akhilesh Yadav yesterday pic.twitter.com/rmq1p8XgwT
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 4, 2022
लखनऊच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये अखिलेश यादव म्हणताना दिसतात, की रोज माझ्या स्वप्नात भगवान श्रीकृष्ण येतात आणि ते मला सांगतात उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष लवकरच सत्ता स्थापन करेल. अखिलेश यादव ज्या अविर्भावात हे वाक्य उच्चारतात त्यानंतर त्यांच्या समवेत बसलेले समाजवादी पक्षाचे नेते जोरजोरात हसत टाळ्या वाजवताना या व्हिडिओ दिसत आहेत. आता भाजपमधून अखिलेश यादव यांनी उडवलेल्या खिल्लीवर नेमके कोणते उत्तर मिळते! आणि समाजवादी पक्षाची प्रति खिल्ली कशी उडवली जाते?, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App