वृत्तसंस्था
लखनौ : उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ सरकारने शेतकऱ्यांनी अनेक योजना जाहीर केल्या. शेतकऱ्यांच्या वीजबिलाच्या थकबाकीसाठी तडजोड योजनेसह त्यांच्याविरुद्धचे गुन्हे मागे घेण्याचाही यात समावेश आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हे पाऊल उचलल्याचे मानले जाते. Yogi govt. declares schemes for farmers
वीजबिल थकल्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याचा वीज पुरवठा खंडित केला जाणार नाही. त्याचप्रमाणे, या थकबाकीचे व्याज माफ करण्याची योजनाही राबविली जाणार आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले, की ऊसाची किंमतही राज्य सरकारकडून वाढविली जाईल. सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून यासंदर्भात निर्णय घेतला जाईल.
राज्याच्या पश्चिम भागातील साखर कारखाने २० ऑक्टोबरपासून तर पूर्व भागातील कारखाने २५ ऑक्टोबरपासून सुरू होतील. शेतकऱ्यांच्या ऊसाची २०१० पासून १.४२ लाख कोटी रुपयांची थकबाकी असून पुढील गळीत हंगाम सुरू होण्याआधी ती दिली जाईल. कोरोना काळातही राज्य सरकारने ५६ लाख टन गहू किमान आधारभूत किमतीला खरेदी केला, अशी माहितीही त्यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App