विशेष प्रतिनिधी
लखनऊ : उस कमब्खको पार्टी से निकालो और यूपी भेजो. बाकी इलाज हम करेंगे. जो व्यक्ती औरंगजेब को नायक मानता है उसे भारत मे रहने का अधिकार होना चाहिये क्या? अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. Yogi Adityanath’s anger on Abu Azmi
महाराष्ट्रातील समाजवादी पार्टीचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे वक्तव्य केले आहे. अबू आझमी यांना अर्थसंकल्पीय अधिवेशन होईपर्यंत निलंबन करण्यात आले आहे. आझमींच्या वक्तव्याचे पडसाद उत्तर प्रदेशापर्यंत उमटले आहेत. औरंगजेबाच्या मुद्यावरुन उत्तर प्रदेश विधानसभेतही राजकारण पेटले आहे. उत्तर प्रदेशमध्येही सुरू अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, समाजवादी पार्टी औरंगजेबाला आदर्श मानत आहे.
औरंगजेबाच्या पित्याने शाहजहांने त्यांच्या आत्मचरित्रात लिहून ठेवले आहे की, खुदा करे की ऐसा कमबख्त किसी को पैदा न हो, औरंगजेबाने त्याच्या पित्याला आग्र्याच्या किल्ल्यात कैद करुन ठेवले होते. अशा औरंगजेबाजे गुणगाण करणाऱ्या कमबख्तला पक्षातूनही बरखास्त केले पाहिजे. त्यांना यूपीला पाठवा त्यांच्यावर आम्ही उपचार करु. त्यांना भारतातही राहण्याचा अधिकार दिला पाहिजे का? समाजवादी पार्टीने यावर उत्तर दिले पाहिजे, अबू आझमीला पक्षातूनही काढून टाकले पाहिजे.
माझ्या समाजवादी मित्रांना विचारू इच्छितो की भारताच्या वैभावशाली परंपरेचा तुम्हाला गौरव नाही का. किमान राम मनोहर लोहिया यांचा तरी मान राखला पाहिजे. त्यांनी भारतीय एकतेचे तीन आधार असल्याचे सांगितले होते, भगवान राम, शीव आणि भगवान कृष्ण. मात्र आजचे समाजवादी हे लोहियांच्या विचारांपासून दूर गेले आहेत. भारताच्या गौरवाला ते मानत नाहीत, अशी टीका योगी आदित्यनाथ यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App