विशेष प्रतिनिधी
लखनऊ : उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकार कुस्तीला बळ देणार आहे. २०३२ च्या ऑलिम्पिक स्पर्धेपर्यंत कुस्ती खेळासाठी १७० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. यासाठी कुस्ती महासंघाला मदत करणार आहे.Yogi Adityanath government to boost wrestling, invest Rs 170 crore till 2031 Olympics
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिज भूषण शरण सिंह म्हणाले की, कुस्ती खेळासाठी उत्तर प्रदेश सरकार २०३२ ऑलिम्पिकपर्यंत १७० कोटी रुपयांची गुंतवणूक करेल, अशी अपेक्षा आहे. ओडिशा सरकारच्या हॉकी खेळाला ज्या प्रकारे पाठिंबा देत आहे, त्यापासून प्रेरणा घेत उत्तर प्रदेश सरकारने कुस्ती खेळासाठी अशाच प्रकारे मदत करण्याची विनंती केली आहे.
सिंह म्हणाले की, ओडिशा हे एक लहान राज्य आहे, तरीही ते हॉकीला इतक्या उत्तम प्रकारे समर्थन देत आहे, म्हणून आम्ही विचार केला की, उत्तर प्रदेश इतके मोठे राज्य असताना कुस्तीचे समर्थन का करू शकत नाही? आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्याचा लगेच स्वीकार केला.
आमच्या प्रस्तावातून आम्ही २०२४ गेम्सपर्यंत दरवर्षी १० कोटी रुपये (म्हणजे ३० कोटी रुपये) आणि नंतर २०२८ च्या पुढील ऑ लिम्पिक सायकलसाठी दरवर्षी १५ कोटी रुपये (एकूण ६० कोटी रुपये) मागितले आहेत. आणि शेवटच्या टप्प्यात २०३२च्या ऑलिम्पिकसाठी दरवर्षी २० कोटी (एकूण ८० कोटी रुपये) मागितले आहेत.
देशातील अव्वल कुस्तीपटूंपुरतेच ही योजना मर्यादित राहणार नाही. कॅडेट स्तरावरील कुस्तीपटूंनाही प्रायोजित केले जाईल आणि आम्ही राष्ट्रीय चॅम्पियन्सनादेखील बक्षीस रक्कमही देऊ शकू, हा यामागचा हेतू आहे.
कुस्ती महासंघाने २०१८ मध्ये भारतीय कुस्तीचे मुख्य प्रायोजक म्हणून टाटा मोटर्ससोबत भागीदारी केली होती, ज्याद्वारे त्यांना १२ कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळाली. त्यामुळे महासंघ टोकियो ऑलिम्पिकपर्यंत कुस्तीपटूंना केंद्रीय करार देऊ शकला. उत्तर प्रदेश सरकारच्या मदतीमुळे भारतीय कॅडेट स्तराचे कुस्तीगीर आता परदेशात प्रशिक्षण दौरेही करू शकतील.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App