विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांत योगी आदित्यनाथ हेच पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचे ५२ टक्के लोकांनी म्हटले आहे. आइएएनएस-सीवोटरच्या सर्व्हेत उत्तर प्रदेशातील जनतेने योगी आदित्यनाथ यांनाच पसंती दर्शविली आहे.Yogi Adityanath again the Chief Minister of Uttar Pradesh, 52% believe in IANS-Seawater survey
उत्तर प्रदेशातील मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ७५ पैकी ६७ जागा जिंकून पहिली फेरी जिंकलीच आहे.
आता ५२ टक्के लोकांनी योगी आदित्यनाथ हेच मुख्यमंत्री होणार असल्याच विश्वास व्यक्त केला आहे. मात्र, ३७ टक्के लोकांनी योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री होणार नसल्याचे म्हटले आहे.
उत्तर प्रदेशातील २०१७ च्या निवडणुकांत भारतीय जनता पक्षाने ३१७ जागा मिळविल्या होत्या. त्यानंतर योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री बनले होते. गेल्या काही दिवसांत योगी आदित्यनाथ यांची बदनामी करण्याच प्रयत्न होत आहे. सुरूवातीला जिल्हा पंचायत निवडणुकांत भाजपाचा पराभव झाला असे पसरविण्यात आले.
मात्र, त्यानंतर झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकांत ७५ पैकी ६७ जागा जिंकून योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिले. त्यानंतर गंगा नदीतील मृतदेहावरूनही योगी आदित्यनाथ यांच्या बदनामीची मोहीम उघडण्यात आली.
मात्र, गंगा नदीत मृतदेह सोडून देण्याची परंपराच असल्याचे उघड झाले. योगी आदित्यनाथांच्या कोरोना काळातील कामगिरीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. मात्र, कोरोनाच्या रुग्णसंख्येनेच विरोधकांना उत्तर देण्यात आले. त्याचेच प्रत्यय सीव्होटरच्या सर्व्हेमध्ये आले आहे. योगींना उत्तर प्रदेशातील निम्याहून अधिक लोकांनी पाठिंबा दिला आहे.
उत्तर प्रदेशात पुढील वर्षी निवडणुका होणार आहेत. यामध्ये भाजपा विरोधात समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी आणि कॉँग्रेस यांच्यात चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. याचबरोबर इतर छोट्या पक्षांनीही आघाडी बनविली आहे. मात्र, योगी आदित्यनाथ यांच्या तोडीचा एकही नेता सध्या विरोधकांकडे नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App