Yogendra Yadav : दिल्लीतील टिकरी बॉर्डर येथे सुरू असलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी कोरोनामुळे बंगालमधील एका तरुणीच्या निधनानंतर या प्रकरणाला नवीन वळण लागले आहे. मृत तरुणीच्या वडिलांचे म्हणणे आहे की, त्यांना त्यांच्या मुलीने फोनवर तिचे शारीरिक शोषण झाल्याची माहिती दिली होती. सामूहिक बलात्काराच्या या प्रकरणातील दोन आरोपी आम आदमी पार्टीचे (आप) नेते आहेत. इतकेच नव्हे, तर ‘दैनिक भास्कर’च्या वृत्तात असा दावा आहे की, योगेंद्र यादव यांना शेतकर्यांच्या टेंटमध्ये झालेल्या गँगरेपची पुरेपूर माहिती होती. Yogendra Yadav Remains Silent On Gang Rape At Tikari Border Farmers Protest, NCW Isuues Notice, Demands Probe
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीतील टिकरी बॉर्डर येथे सुरू असलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी कोरोनामुळे बंगालमधील एका तरुणीच्या निधनानंतर या प्रकरणाला नवीन वळण लागले आहे. मृत तरुणीच्या वडिलांचे म्हणणे आहे की, त्यांना त्यांच्या मुलीने फोनवर तिचे शारीरिक शोषण झाल्याची माहिती दिली होती. सामूहिक बलात्काराच्या या प्रकरणातील दोन आरोपी आम आदमी पार्टीचे (आप) नेते आहेत. इतकेच नव्हे, तर ‘दैनिक भास्कर’च्या वृत्तात असा दावा आहे की, योगेंद्र यादव यांना शेतकर्यांच्या टेंटमध्ये झालेल्या गँगरेपची पुरेपूर माहिती होती.
पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी 6 जणांविरुद्ध कलम 120 बी, 342, 354, 365, 376 डी आणि 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये शेतकरी नेते आणि आम आदमी पक्षाचे कार्यकर्तेही आहेत. असे म्हणतात की, ही घटना योगेंद्र यादव यांना माहिती होती. परंतु पीडितेच्या मृत्यूनंतरही त्यांना याबाबत पोलिसांना अवगत करावेसे वाटले नाही.
Jhajjar | An activist from West Bengal, who came to participate in farmers' protest at Delhi-Haryana Tikri border was allegedly raped “As per her father,she was raped. The victim was hospitalised for COVID &succumbed to it on Apr30. Case registered, probe on,”said Police (9.05) pic.twitter.com/IeSsnGWuP6 — ANI (@ANI) May 10, 2021
Jhajjar | An activist from West Bengal, who came to participate in farmers' protest at Delhi-Haryana Tikri border was allegedly raped
“As per her father,she was raped. The victim was hospitalised for COVID &succumbed to it on Apr30. Case registered, probe on,”said Police (9.05) pic.twitter.com/IeSsnGWuP6
— ANI (@ANI) May 10, 2021
30 एप्रिल रोजी झज्जरच्या रुग्णालयात पीडितेच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. बहादूरगड पोलीस ठाण्याचे अधिकारी विजय कुमार म्हणतात, “त्या महिलेचा मृत्यू कोरोनामुळे झाला.” तिच्यावर कोरोना रुग्णांप्रमाणेच उपचार झाले होते. आम्ही कागदपत्रांसाठी अर्ज केला आहे. आमच्याकडे काही कागदपत्रे उपलब्ध झाल्यावर हा मृत्यू कोरोनाशी संबंधित होता किंवा कसे याबाबत आम्हाला निश्चित करता येईल.”
एक कोविड संक्रमित महिला के साथ टिकरी बॉर्डर पर बलात्कार होता है, ६ लोगों पर FIR होती है जिसमें २ अरविंद केजरीवाल की पार्टी के नेता है। #बलात्कारी_आंदोलनजीवी इस मामले को दबाना चाहते है… क्या किसानों के नाम पर चलाया जा रहा ये आंदोलन महिलाओं के साथ बलात्कार का अड्डा बन गया है? pic.twitter.com/T06E3lh3tc — Amit Malviya (मोदी का परिवार) (@amitmalviya) May 10, 2021
एक कोविड संक्रमित महिला के साथ टिकरी बॉर्डर पर बलात्कार होता है, ६ लोगों पर FIR होती है जिसमें २ अरविंद केजरीवाल की पार्टी के नेता है। #बलात्कारी_आंदोलनजीवी इस मामले को दबाना चाहते है…
क्या किसानों के नाम पर चलाया जा रहा ये आंदोलन महिलाओं के साथ बलात्कार का अड्डा बन गया है? pic.twitter.com/T06E3lh3tc
— Amit Malviya (मोदी का परिवार) (@amitmalviya) May 10, 2021
मृत तरुणीच्या वडिलांनी आपल्या तक्रारीत 6 जणांची नावे घेतली आहेत. अनिल मलिक, अनूपसिंग छनौत, अंकुर सांगवान, कविता आर्य, जगदीश ब्रार आणि योगिता सुहाग अशी त्यांची नावे आहेत. हे सर्व लोक संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने बंगालमध्ये गेले होते. त्यावेळी ती मुलगी आणि तिच्या वडिलांना हे सर्व भेटले. मृत पीडितेने तेव्हा आंदोलनात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर 11 एप्रिलला ती हावड्याहून आरोपींसोबत रवाना झाली.
तक्रारीनुसार पीडितेने तिच्या वडिलांना सांगितले की, अनिल आणि अनूप चांगले लोक नव्हते. प्रवासादरम्यान, प्रत्येकजण झोपलेला असताना अनिल जवळ आला आणि तिच्यावर जबरदस्ती केली. तिने त्याचा प्रतिकार करून त्याला पुन्हा असे न करण्याचा इशाराही दिला. पण यानंतर अनिल आणि अनुपने तिला ब्लॅकमेल आणि तिच्यावर दबाव आणण्यास सुरुवात केली.
वडिलांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मुलीवर प्रवासात रेल्वेतही जबरदस्ती झाली आणि नंतर आंदोलनस्थळी पोहोचल्यावर तिला आरोपींसह टेंट शेअर करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. पीडितेने वडिलांना सर्व घटना सांगितली तेव्हा त्यांनी तिला आंदोलनातील काही महिलांना विश्वासात घेऊन सर्व घटना सांगण्यास सांगितले.
दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, संयुक्त किसान मोर्चाचे सदस्य योगेंद्र यादव यांचे नावही महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये समोर आले आहे. वडिलांचे म्हणणे आहे की, शेतकरी आंदोलनात मुलीवर बलात्कार झाल्याची माहिती योगेंद्र यादव यांना होती. 24 एप्रिलपासून ते मुलीशी संपर्कात होते, परंतु मृत्यूच्या आधी किंवा नंतरही त्यांनी संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना दिली नाही.
Sending a notice to @_YogendraYadav who himself is saying that the girl who was allegedly raped at #TikriBorder gave him hint about sexual assault and he didn't report to police. — Rekha Sharma (@sharmarekha) May 11, 2021
Sending a notice to @_YogendraYadav who himself is saying that the girl who was allegedly raped at #TikriBorder gave him hint about sexual assault and he didn't report to police.
— Rekha Sharma (@sharmarekha) May 11, 2021
दरम्यान, योगेंद्र यादवांसारखा शेतकरी नेता गप्प राहून नेमकी कुणाची बाजू घेत होता असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. बलात्कारासारखा जघन्य अपराध झालेला असतानाही योगेंद्र यादव गप्प राहिल्याने राष्ट्रीय महिला आयोगानेही दखल घेतली आहे. यावरून राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी योगेंद्र यादवांना नोटीसही बजावली आहे. तसेच पोलिसांना यादवांच्या भूमिकेचीही चौकशी करण्याची विनंती केली आहे.
Yogendra Yadav Remains Silent On Gang Rape At Tikari Border Farmers Protest, NCW Isuues Notice, Demands Probe
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App