वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पद्मश्री सन्मानप्राप्त स्वामी शिवानंद हे १२५ वर्षांचे आहेत. त्यांच्या दीर्घआयुष्याचे रहस्य त्यांच्या दिनचर्येत दडले आहे. Yoga, spices and oil-free food is the secret of longevity of 125 year old Swami Sivananda
योगाचार्य असलेले शिवानंद यांना सोमवारी पद्मश्री सन्मानाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते गौरविण्यात आले. योगाचार्य शिवानंद यांचा जन्म १८९६ मध्ये सिल्हेत जिल्ह्यात (सध्याचा बांगलादेश ) झाला. त्यांनी योग प्रसारात अमूल्य योगदान दिले असून त्याला दिनचर्येचा भाग बनविले आहे. मसाले आणि तेल विरहित भोजन ते घेतात. गेली ५० वर्षे त्यांनी हा नियम पाळला आहे.
https://youtu.be/yLGaALocgxM
जगन्नाथ पुरीचे रहिवासी असलेले शिवानंद हे ४०० ते ६०० कुष्ठग्रस्त भिकाऱ्यांची सेवा करतात. त्यांना अन्न आणि कपडे अन्य जीवनावश्यक वस्तू ते पुरवितात. योगासनांचा दैनंदिन जीवनात समावेश केल्यामुळे दीर्घआयुष्य मला प्राप्त झाल्याचे त्यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे कोणाच्याही आधाराशिवाय या वयात ते पद्मश्री सन्मान घेताना दिसले. त्यातूनच भारतीय जीवशैली उत्कृष्ठ असल्याचे सिद्ध झाले असून योगसनाचे महत्व जीवनात अधिक असल्याचे अधोरेखित झाले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App