यो यो हनी सिंगला उत्तर देण्यासाठी 28 ऑगस्टपर्यंत मुदत
यो यो हनी सिंगचं खरं नाव हर्देश सिंग असं आहे. कॉकटेल चित्रपटानंतर यो यो हनी सिंगला प्रसिद्धी मिळाली. अंग्रेजी बिटसे हे गाणं त्यानं गायलं होतं जे गाणे प्रचंड लोकप्रिय झालं होतं. हनी सिंग आणि शालिनी यांचं लग्न 2011 मध्ये झालं आहे. आज ब्लू है पानी पानी हे त्याचं गाणंही बरंच लोकप्रिय झालं. तसंच चेन्नई एक्स्प्रेसच्या लुंगी डान्स या गाण्यानेही सगळे रेकॉर्ड तोडले होते. Yo Yo Honey Sing: Honey Singh v. Wife beaten and mentally abused; Notice issued by the court
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : प्रसिद्ध पॉप आणि रॅप गायक यो यो हनी सिंग विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हनी सिंगची पत्नी शालिनीने हनी सिंग विरोधात दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयात कौटुंबिक हिंसाचारात महिलांचे संरक्षण अधिनियम अंतर्गत याचिका दाखल केली आहे.
दिल्लीतील तीस हजारी न्यायालयाने या प्रकरणी हनीसिंगला नोटीस पाठवली असून त्याच्याकडून उत्तर मागितलं आहे. 28 ऑगस्टपर्यंत उत्तर देण्यासाठी हनी सिंगला मुदत देण्यात आली आहे.
हनी सिंगने मारहाण केली, लैंगिक शोषण केला, मानसिक छळ आणि आर्थिक फसवणूक केली असा आरोप शालिनीने याचिकेत केला आहे. हनी सिंगच नाही तर त्याचे आई वडील आणि बहिण यांच्या विरोधातही मारहाण करणं, छळ आणि शोषण असे आरोप केले आहेत. शालिनीने केलेल्या या याचिकेनंतर तीस हजारी न्यायालयाने हनी सिंग विरोधात नोटीस जारी केली आहे. दोघांची संयुक्त मालम्ता विकू नये, शालिनीबाबत कोणताही निर्णय घेऊ नये असे स्पष्ट निर्देशही कोर्टाने दिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App