विशेष प्रतिनिधी
बंगळूर : कर्नाटक भाजपमधील सर्वांत शक्तिमान नेते व राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी आता पक्षातील विरोधकांविरुद्ध चांगलेच दंड थोपटले आहेत.Yediurappa target party opponants
जोपर्यंत भाजप पक्षश्रेष्ठींचा विश्वास आहे, तोपर्यंत राज्य सरकारचे नेतृत्व करेन,’’ असे सांगून त्यांनी नेतृत्व बदलाची मागणी करणाऱ्यांना खणखणीत इशाराच दिला आहे.
नाराज आमदारांच्या एका गटाने मुख्यमंत्र्यांना काढून टाकण्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्याच्या वृत्तावर त्यांनी हे विधान केले आहे. राज्य सरकारच्या नेतृत्वाविरोधात तक्रारी घेऊन काही नेते अलीकडेच दिल्लीला गेले होते.येडियुराप्पा यांच्या समर्थक आमदारांनी सह्यांची मोहीम हाती घेतली आहे. येडियुराप्पा यांना भाजपच्या ८० टक्के आमदारांचा पाठिंबा असल्याचे समजते.
मुख्यमंत्र्यांविरोधात काही मंत्री आणि आमदारांकडून वारंवार तक्रारी केल्या जात असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, ‘‘मी या गोष्टींवर प्रतिक्रिया देणार नाही. जोपर्यंत पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे, तोपर्यंत मी मुख्यमंत्रिपदावर कायम राहीन.
ज्या दिवशी ते आपल्याला पद सोडायला सांगतील, त्याच क्षणी आपण राजीनामा देऊ. आपण पक्ष आणि सरकारची कोणतीही कोंडी करीत नाही. पक्षनेतृत्वाने आपल्याला संधी दिली आहे, ज्याचा आपण चांगला उपयोग करीत आहे. बाकी सर्वकांही हायकमांडवर सोडले आहे.’’
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App