विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : चीनमधील कम्युनिस्ट पक्षाला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त दिल्लीतील चिनी दूतावासाकडून आयोजित कार्यक्रमामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे डी. राजा आणि अन्य नेते सहभागी झाले.Yechuri, D raja present for communist partys prog.
भारत व चीन दरम्यानचे संबंध गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर कमालीचे ताणले गेले आहेत. त्यामुळे कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यक्रमाला भारतीय नेते उपस्थित राहिल्याने सर्वाच्या भुवया उंचावल्या आहेत.
येचुरी आणि राजा यांच्याशिवाय लोकसभेचे खासदार एस. सेंथीलकुमार, जी. देवराजन, अन्य सरचिटणीस, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकच्या केंद्रीय समितीचे सदस्य आणि आंतरराष्ट्रीय विभागाचे सदस्य व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले.
या कार्यक्रमाचा भारत- चीन वादाशी काहीही संबंध नव्हता त्यामुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यात गैर काय? असा थेट सवाल डी. देवराजन यांनी केला. भारत सरकारने देखील चीनच्या कम्युनिस्ट पक्षाला शुभेच्छा दिल्याच्या बाबीकडेही त्यांनी यावेळी लक्ष वेधले.
कम्युनिस्ट पक्षाला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त चीनने वर्षभर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. वरील कार्यक्रम हा त्याचाच एक भाग होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App