वृत्तसंस्था
नवी दिल्ली : काश्मिरी फुटीरतावादी नेता आणि हुरियत कॉन्फरन्स म्होरक्या यासिन मलिक याला टेरर फंडिंग केस मध्ये दोन जन्मठेपेची आणि 10 लाख रुपये दंडाची शिक्षा राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयए कोर्टाने ठोठावली आहे. Yasin Malik sentenced to two life terms
यासिन मलिक वर एकूण 10 आरोप सिद्ध झाले. त्यामध्ये सर्वात मोठा आरोप टेरर फंडिंगचा आहे. त्यामुळे यासिन मलिक एकापाठोपाठ एक भोगायच्या अशा दोन जन्मठेपेच्या शिक्षा न्यायालयाने ठोठावल्या आहे. त्याचबरोबर त्याला 10 लाख रुपयांचा दंडही सुनावला आहे. या सर्व शिक्षा एकत्र भोगावयाच्या आहेत. सध्या यासिन मलिक हा दिल्लीतल्या तिहार तुरुंगामध्ये जेरबंद आहे. एडवोकेट उमेश शर्मा यांनी ही माहिती दिली आहे.
– यासिन मलिकला गुन्हा कबूल… पण त्यामागचा नेमका डाव काय??
यासिन मलिक याने राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयए कोर्टामध्ये आपल्यावरचे सर्व गुन्हे कबूल केल्यानंतर आणि आरोप पूर्ण सिद्ध झाल्यानंतर शिक्षा ठोठावल्या आहेत. युएपीए कलम 16 दहशतवादी कृत्यांमध्ये सामील होणे, कलम 17 दहशतवादी कृत्यांसाठी हवाला रॅकेट मधून पैसे पुरवणे, कलम 18 दहशतवादी कृत्यांची कारस्थाने रचणे आणि कलम 20 दहशतवादी संघटनेचा सदस्य असणे या कलमांखाली यासिन मलिक वरचे गुन्हे एनआयए कोर्टात गुन्हे सिद्ध झाले. आहेत. हे सर्व गुन्हे त्याने कबूल केले आहेत. त्याचा प्रतिवाद करण्याची त्याला गरज वाटली नाही.
– बिट्टा कराटे सकट सर्वांवर आरोपपत्र!!
यासिन मलिक यांच्याखेरीज कोर्टाने आज काल फारूक अहमद डार उर्फ बिट्टा कराटे, शब्बीर शाह, मसर्रत आलम, मोहम्मद यूसुफ शाह, आफताब अहमद शाह, अल्ताफ अहमद शाह, नईम खान, मोहम्मद अकबर खांडे, राजा मेहराजुद्दीन कलवाल, बशीर अहमद भट, जहूर अहमद शाह वटाली, शब्बीर अहमद शाह, अब्दुल राशिद शेख, और नवल किशोर कपूर सहित अन्य काश्मिरी फुटीरतावादी नेत्यांवर आरोप निश्चित केले आहेत. त्यांच्यावर देखील वर उल्लेख केलेल्या कलमानुसारच खटले चालणार आहेत. त्यांच्या खेरीज लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक हाफिज सईद अनेक हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाउद्दीन या पाकिस्तानात लपून बसलेल्या दहशतवाद्यांविरुद्धही आरोप निश्चित करण्यात आले आहेत.
Terror funding case | Two life imprisonments have been given to Yasin Malik, besides that 10 years of rigorous imprisonment in 10 offences and Rs 10 lakh penalty, all the punishments will run concurrently: Advocate Umesh Sharma pic.twitter.com/9bJCZ8RHml — ANI (@ANI) May 25, 2022
Terror funding case | Two life imprisonments have been given to Yasin Malik, besides that 10 years of rigorous imprisonment in 10 offences and Rs 10 lakh penalty, all the punishments will run concurrently: Advocate Umesh Sharma pic.twitter.com/9bJCZ8RHml
— ANI (@ANI) May 25, 2022
– गुन्हे कबूल करण्यामागचे रहस्य काय??
– यासिन मलिक या फुटीरतावादी नेत्याने आपल्यावर चे सगळे गुन्हे कबूल करण्यामागचे रहस्य काय?? कोर्टाने दिलेली शिक्षा त्याला मंजूर होणार का?? तो त्या शिक्षेविरोधात वरिष्ठ न्यायालयात अपील करणार का?? वगैरे प्रश्न तयार होत आहेत.
– या प्रश्नांची उत्तरे यासिन मलिक आणि अन्य फुटीरतावादी नेत्यांच्या विशिष्ट भूमिकेतच दडली आहेत. या सर्व फुटीरतावादी नेत्यांना भारतीय न्यायव्यवस्था अथवा भारतीय प्रशासन व्यवस्था मान्य नाही. त्यामुळे अर्थातच त्यांना एनआयए कोर्ट मान्य असण्याची सुतराम शक्यता नाही. तरी देखील त्या कोर्टात युएपीए कायद्याखाली लावलेले आरोप मान्य करतात याचा अर्थ ते स्वतःला काश्मिरी स्वातंत्र्यसैनिक म्हणवतात.
– कोर्टाने सजा दिली की त्याचा ते प्रपोगंडा करण्याचा मनसूबा राखतात. भारतीय न्यायव्यवस्था आणि प्रशासन व्यवस्था आपल्यावर म्हणजे काश्मिरींवर कसा अन्याय करत आहे याचा धिंडोरा पिटण्याचा त्यांचा कावा आहे. आणि त्यातूनच यासिन मलिक सारखे फुटीरतावादी नेते आपल्या वरचे सर्व आरोप मान्य करून मोकळे होत असण्याची शक्यता दाट आहे.
– यूपीए सरकारच्या वाटाघाटींमध्ये सन्मान
– हाच तो यासिन मलिक आहे, ज्याला आधीच्या यूपीए सरकारमध्ये वाटाघाटींसाठी सन्मानपूर्वक बोलावले जात होते. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या बरोबर तो दिसत असे. आता मात्र केंद्र सरकारने फुटीरतावादी नेत्यांच्या विरोधात कठोर पावले उचलत त्यांना कायद्याच्या कचाट्यात अडकवले आहे. त्यामुळे देखील फुटीरतावादी नेत्यांवर एक विशिष्ट दबाव तयार झाला आहे. ही वस्तुस्थिती देखील बरीच बोलकी आहे.
– या पार्श्वभूमीवर यासिन मलिक आणि अन्य फुटीरतावादी नेते आता पुढची चाल कशी खेळतात, हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App