शी जिनपिंग यांना मांडावी लागली चार सूत्रे; पण सुप्रिया सुळे यांनी “पाजळली” जवाहरलाल नेहरूंची पंचशील तत्त्वे!!

ट्रम्प टेरिफचा सगळ्या जगाच्या डोक्याला ताप झाला असताना चीनने भारताला जवळ केले. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी भारत आणि चीन यांच्या आपल्या संबंधांमध्ये सुधारणा करण्यासाठी चार सूत्रे सूचविली. त्या सूत्रांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सकारात्मक आणि सावध प्रतिसाद दिला. पण भारत चीन सीमा वादाच्या आणि चीनच्या अतिक्रमणाच्या प्रवृत्तीच्या पार्श्वभूमीवर भारत शी जिनपिंग यांच्या चार सूत्रांवर पंचशील करारासारखा विश्वास ठेवेल का??, असा सवाल समोर आला आहे. पण या अत्यंत महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांची पंचशील तत्त्वे “पाजळली.” जणू काही मोदी सरकार नेहरूंच्या परराष्ट्र धोरणाचा अवलंब करत आहे, असा आव सुप्रिया सुळे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना आणला. Xi Jinping

सुप्रिया सुळे या काही परराष्ट्रविषयक तज्ज्ञ नाहीत. चार वेळा खासदार राहून सुद्धा त्या आत्तापर्यंत एकदाही त्या पलीकडचे पद मिळवू शकलेल्या नाहीत. पंतप्रधान मोदींनी पाठविले म्हणून त्या परदेशांमध्ये भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करायला गेल्या. मोदींनी त्यांची निवड केली नसती, तर ती संधी सुद्धा त्यांना मिळू शकली नसती.

पण याच सुप्रिया सुळे यांनी भारत आणि चीन यांच्यात या संबंधाबाबत आपली * “पाजळली.” मोदी सरकार आणि त्यांचे मंत्री गेली दहा-अकरा वर्षे जवाहरलाल नेहरूंवर टीका करताहेत. पण शेवटी त्यांना नेहरूंच्याच मार्गाने जाऊन चीन आणि रशियाशी मैत्री करावी लागली, असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला. पण नेहरूंच्या काळातली भारत – चीन मैत्री आणि मोदींच्या काळातली भारत आणि चीन यांच्यातील राजकीय जवळीक यातला मूलभूत भेद आणि फरक त्या विसरल्या. किंबहुना त्यांनी त्याकडे हेतूत: दुर्लक्ष केले.

– नेहरूंचा पंचशील करार

मूळात पंतप्रधान पंडित नेहरूंच्या काळात भारत आणि चीन यांच्यातील मैत्री एक प्रबळ राष्ट्र आणि दुर्बल राष्ट्र यांच्यातील मैत्री होती. भारताला प्रबळ राष्ट्र बनवण्याची संधी नेहरूंनी गमावली कारण त्यांना शांततेची जास्त तहान लागली होती. जगातल्या शांततेची जबाबदारी फक्त भारताची आहे. इतरांची नाही, असा त्यांचा समज होता. त्यामुळे शांततेची कबुतरे उडवणे आणि शांततेची लेक्चर देणे या पलीकडे नेहरूंचे परराष्ट्र धोरण फारसे कधी गेले नाही याचा हवाला के. एम. पण्णीकर, बाबासाहेब आंबेडकर, सावरकर, सरदार पटेल यांच्या लेखनातून आणि पत्रातून मिळतो.

नेहरू आणि चौ एन लाय यांनी 1954 मध्ये पिकिंग मध्ये जो पंचशील करार केला होता त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा दोन्ही देशांनी एकमेकांवर आक्रमण करण्याचा होता. बाकीचे मुद्दे परस्पर सहकार्याचे होते. एकमेकांच्या सार्वभौमत्वाचा आदर राखून एकमेकांच्या देशांवर अतिक्रमण न करणे आणि आक्रमण न करणे हा पंचशील कराराचा गाभा होता. जो नेहरूंच्या आग्रहामुळे ठेवण्यात आला होता. पण या कराराद्वारे नेहरूंनी तिबेटचे दान चीनच्या पदरात टाकले होते. तिबेट बफर स्टेट असताना ते चीनच्या घशात घातले होते.

पंचशील करार करण्याच्या आसपास नेहरूंनी भारताचे लष्करी बळ वाढवणे अपेक्षित होते. परंतु, तसे त्यांनी केले नाही. याचा गैरफायदा चीनने घेतला आणि 1962 मध्ये पंचशील करार गुंडाळी करून चीनने भारतावर आक्रमण केले. त्या युद्धात भारताचा पराभव केला. संरक्षणासाठी महत्त्वाच्या क्षेत्राकडे नेहरू सरकारचे दुर्लक्ष झाले म्हणून चीन भारतावर आक्रमण करू शकला होता.



– नेहरूंच्या चुका सगळ्या सरकारांसाठी धडा

पण नेहरू सरकारच्या या चुकीपासून पुढची सगळी सरकारे व्यवस्थित धडा शिकली इंदिरा गांधी यांच्या सरकार पासून ते मोदींच्या सरकारपर्यंत सगळ्या सरकारांनी चीनशी व्यवहार करताना अत्यंत सावध भूमिका घेतली त्याचवेळी भारताला नुसती शांततेची कबुतरे उडवून चालणार नाहीत. शांततेची लेक्चर बाजी करून चालणार नाही. जागतिक शांतता की फक्त भारताची जबाबदारी नाही, या तत्त्वांवर आधारित परराष्ट्र धोरण सगळ्या सरकारांनी आखले आणि कमी अधिक फरकाने ते व्यवस्थित लागू केले. इंदिरा गांधी यांच्यापासून ते मोदी यांच्या पर्यंतच्या सगळ्या पंतप्रधानांनी पंचशील करार नावाचे भूत आपल्या खांद्यावरून उतरवून ठेवले.

– शी जिनपिंग यांची चार सूत्रे

त्याचवेळी जागतिक पातळीवरच्या बदललेल्या परिस्थितीत चीनला भारताशी जुळवून घ्यावे लागले. कारण आत्ताचा भारत नेहरूंचा भारत नाही तो मोदींचा भारत आहे याची जाणीव भारतातल्या विरोधकांपेक्षा आणि सुप्रिया सुळे यांच्यासारख्या नसलेली * पाजळणाऱ्यांपेक्षा चिनी राज्यकर्त्यांना जास्त आहे. म्हणूनच अमेरिकेसारख्या महासत्तेला तोंड द्यायचे असेल तर भारत चीन आणि रशिया यांनी एकत्रित गठजोड केला पाहिजे. त्यातही भारताला बरोबरीचा पार्टनर (equal partner) मानले तरच ते शक्य आहे, याची जाणीव चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना झाली. त्यांनी भारताबरोबर सहकार्य करण्याची चार सूत्रे मांडली. किंबहुना त्यांना ती मांडावी लागली. भारत आणि चीन एकमेकांचे “स्पर्धक” नाहीत, तर “सहकारी” आहेत असे म्हणावे लागले. दोन्ही देशांनी एकमेकांना सहकार्य करून आपली प्रगती साधावी. दोन्ही देशांनी एकमेकांचे फायदे करून द्यावेत. दोन्ही देशांसाठी win win परिस्थिती निर्माण करावी, असा प्रस्ताव शी जिनपिंग यांना द्यावा लागला. कारण अमेरिकन टेरिफशी टक्कर घेणे भारतापेक्षा चीनला अवघड आहे. कारण अमेरिकेत भारताचे जेवढे stakes आहेत, त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक stakes चीनचे त्या देशात आहेत. त्यामुळे ट्रम्प टेरिफच्या पार्श्वभूमीवर भारताचे सहकार्य चीनला मागावे लागले. त्यासाठीच शी जिनपिंग यांना भारताशी सहकार्य करण्याची चार सूत्रे मांडावी लागली.

महत्त्वाचे म्हणजे पंचशील करार नेहरूंच्या आग्रहाने झाला होता, पण भारत आणि चीन यांच्यातील मैत्री वाढवण्यासाठीची चार सूत्रे शी जिनपिंग यांना मांडावी लागली. हा महत्त्वाचा फरक सुप्रिया सुळे यांनी लक्षात घेतला नाही. तसा तो त्यांनी सांगितला देखील नाही. त्यांनी जवाहरलाल नेहरूंचे नाव घेऊन फक्त मोदी सरकारला ठोकण्यापलीकडे दुसरे काही केले नाही.

Xi Jinping four points formula to increase Indo China ties

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात