Wrestlers Protest : सरकार कुस्तीपटूंशी चर्चा करण्यास तयार; अनुराग ठाकूर म्हणाले…

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याविरोधात कुस्तीपटूंचे आंदोलन सुरू .

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : ब्रिजभूषण शरण सिंग विरुद्ध कुस्तीपटूंचे आंदोलन सुरूच राहणार आहे. खरंतर कुस्तीपटू नोकरीवर परतले आहेत, त्यांनी हे स्पष्ट केलं आहे की, सरकारची त्यांना  कोणतीही अडचण नाही. कुस्तीपटूंना ब्रिजभूषण शरण सिंगची अडचण आहे. दरम्यान, केंद्र सरकारने पैलवानांशी चर्चा करण्याचे मान्य केले आहे. पुन्हा एकदा अनुराग ठाकूर यांनी त्यांना या विषयावर चर्चा करण्यासाठी बोलावणे पाठवले आहे. Wrestlers Protest  Govt ready to talk with wrestlers Anurag Thakur informed

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विट केले की, “सरकार कुस्तीपटूंशी त्यांच्या मुद्द्यावर चर्चा करण्यास उत्सुक आहे. मी पुन्हा एकदा कुस्तीपटूंना त्यासाठी आमंत्रित केले आहे.”

सरकारने पुढाकार घेतल्यानंतर खेळाडूंनी सकाळी ९ वाजता बैठक बोलावली. परस्पर सहमतीनंतर सरकारला कधी भेटायचे याचा निर्णय घेतला जाणार आहे. सर्व खेळाडू सोनीपतमध्ये असून ते आज दिल्लीत येऊ शकतात. ब्रिजभूषण शरणसिंग यांच्या विरोधात महिनाभराहून अधिक काळ आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंच्या प्रकरणात केंद्रीय क्रीडामंत्र्यांनी मंगळवारी (६ जून) चर्चेचे आमंत्रण दिल्याने नवीन वळण आले.

Wrestlers Protest  Govt ready to talk with wrestlers Anurag Thakur informed

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub