विशेष प्रतिनिधी
लेह- लद्दाख : आज लेहमध्ये जगातला सर्वात मोठा खादीचा तिरंगा फडकवला गेला. हा झेंडा २२५ फूट लांब व १५० फूट रुंद आहे. गांधी जयंतीच्या दिवशी केंद्रशासित प्रदेश लेहमध्ये भारताच्या सर्वात मोठ्या झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले आहे.
World’s largest Khadi national flag in Leh weighing 1000 kg
लद्दाखचे उपराज्यपाल आर के माथुर यांनी हा खादीचा तिरंगा फडकवला. यावेळी सेना प्रमुख जनरल एम एम नरवणे उपस्थित होते. हा ध्वज १००० किलो वजनाचा आहे. हा झेंडा मिलिटरीच्या ५७ इंजिनियर रेजिमेंटनी तयार केला आहे. यावेळी या ध्वजाच्या सम्मान म्हणून हवाई दलाच्या हेलिकॉप्टर्सनी सलामी दिली. (इंग्लिश मधील Fly Past शब्दाचा अर्थ – उड्डाण केले)
युगपुरुष महात्मा गांधी यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त
केंद्रीय आरोग्य मंत्री मंनसुख मांडविया यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. व ते म्हणतात, “गांधी जयंतीच्या या दिवशी जगातील सर्वात मोठा खादीचा तिरंगा फडकवला गेला हे देशाच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. या उत्कृष्ट कामगिरीला मी सलाम करतो. भारतीय कलेला प्रोत्साहन देणारे आणि बापूंच्या स्मृतिचे हे स्मारक आहे.”
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App