World Military Expense : लष्करी खर्चात भारत पोहचला टॉप-5 मध्ये, जाणून घ्या पाकिस्तानला कितवे स्थान मिळाले?

स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) च्या अहवालातून जगभरातील देशांच्या संरक्षण खर्चाबाबत माहिती समोर आली आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारत हा जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठे संरक्षण बजेट असलेला देश बनला आहे. 2022 मध्ये भारताने सशस्त्र दलांसाठी उपकरणांचे आधुनिकीकरण आणि लष्करी पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी एकूण 23 टक्के खर्च केला आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) च्या अहवालात जगातील सर्व देशांच्या संरक्षण खर्चाबाबतचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. World Military Expense India reached the top 5 in military expenditure

गेल्या वर्षी, भारताकडून अर्थसंकल्पात लष्करी खर्चासाठी 5.25 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, तर 2021 ते 2022 मध्ये 4.78 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. SIPRI च्या अहवालानुसार, जगभरातील देशांनी त्यांच्या सैन्यावर 2240 अब्ज डॉलर म्हणजेच 183 लाख कोटी रुपये खर्च केले आहेत.  तथापि, रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे 2021 च्या तुलनेत हा खर्च 3.7 टक्क्यांनी वाढून 2240 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. युद्धामुळे, युक्रेनचा लष्करी खर्च सहा पटीने वाढला आहे आणि तो 44 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला आहे.

टॉप 5 देशांद्वारे लष्करी खर्चाची आकडेवारी –

या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. तर सौदी अरेबिया पाचव्या क्रमांकावर आहे, ज्याने गेल्या वर्षी ७५ अब्ज डॉलर खर्च केले आहेत. रशिया तिसऱ्या क्रमांकावर असून, रशियाने ८६.४ अब्ज डॉलर खर्च केले आहेत, तर चीन दुसऱ्या क्रमांकावर आणि अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. चीनने 292 अब्ज डॉलर तर अमेरिकेने 877 अब्ज डॉलर खर्च केले आहेत.

पाकिस्तान 24 व्या स्थानावर –

लष्करी खर्चाच्या बाबतीत भारत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे, तर शेजारील देश पाकिस्तानला या अहवालात 24 वा क्रमांक मिळाला आहे. मात्र, आर्थिक संकटाच्या काळातही पाकिस्तानकडून संरक्षण खर्चात सातत्याने वाढ होत आहे. 2022 मध्ये पाकिस्तानने 10.3 अब्ज डॉलर खर्च केले आहेत.

World Military Expense India reached the top 5 in military expenditure

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात