आगामी निवडणुकीत मोदींचे हात बळकट करण्यासाठी कामाला लागा – एकनाथ शिंदे

बीज जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

विशेष प्रतिनिधी

बीड : जिल्ह्यातील परळी, अंबेजोगाई आणि वडवणी तालुक्यातील ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच यांनी शुक्रवारी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी ठाकरे गटातून शिवसेनेत सामील झालेले अनिल जगताप, जिल्हाप्रमुख सचिन मुळूक आणि बीड जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. Work to strengthen Modis hand in upcoming elections Eknath Shinde



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी दीड वर्षांपूर्वी आम्ही वेगळा निर्णय घेतला. त्यानंतर सत्तेत आल्यापासून घेतलेला प्रत्येक निर्णय हा शेतकरी, कष्टकरी, कामगार, आदिवासी, महिला, विद्यार्थी यांच्या हितासाठी घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शुभहस्ते राज्यातील काही महत्वाच्या विकासकामांचे लोकार्पण झाले. शिवसेनाप्रमुखांचे राम मंदिर बांधण्याचे आणि काश्मीरमधून ३७० कलम हटविण्याचे स्वप्न पंतप्रधान मोदी यांनीच पूर्ण केले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांचे हात बळकट करण्यासाठी कामाला लागा. बीड जिल्ह्यातील इतर रखडलेल्या प्रश्नांना आता नक्की गती देऊ असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना स्पष्ट केले.

Work to strengthen Modis hand in upcoming elections Eknath Shinde

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात