विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : नव्या भारतात त्यातही मोदी सरकारच्या काळात महिला शक्तीचा डंका वाजतोय. कारण वंदे भारत एक्सप्रेस ते सैन्यात ही महिला शक्ती आपला लढाऊ बाणा दाखवते आहे. Woman power new India’s power!!
केंद्रातील मोदी सरकारने महिलांसाठी सैन्य दलातल्या सर्व विभागांमध्ये अधिकारी पदाच्या जागा खुल्या केल्या आहेतच, पण त्याचबरोबर नागरी विकासात महिलांचा वाढता आणि निर्णायक सहभाग वाढविण्यासाठी देखील दमदार पावले उचलली आहेत. त्यामुळेच भारताची महिला शक्तीच्या कर्तृत्वाचा डंका वंदे भारत एक्सप्रेस पासून ते सियाचीन ग्लेशियर पर्यंत वाजवताना दिसतो आहे.
वंदे भारत लोको पायलट सुरेखा यादव
भारतीय रेल्वे सेवेतल्या सुरेखा यादव या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसच्या महिला पायलट ठरल्या आहेत. त्यांनी वंदे भारत एक्सप्रेस चालवून नव्या भारताचा नवा वेग पकडण्यात महिला शक्तीही आघाडीवर असल्याचे दाखवून दिले आहे.
कॅप्टन शालिजा धामी, शिवांगी सिंह
त्याचबरोबर भारतीय हवाई दलात आता केवळ ग्राउंड सेवा न देता प्रत्यक्ष फायटर प्लेन चालवणे आणि त्याची कमांड करणे यातही भारतीय महिला शक्ती आघाडीवर आहे. कॅप्टन सालीमा धामी या भारतीय हवाई दलाच्या फ्लाईट युनिट च्या पहिल्या महिला भारतीय कमांडर आहेतच, त्याचबरोबर शिवांगी सिंह या राफेल लढाऊ विमान उडविणाऱ्या पहिल्या महिला पायलट ठरल्या आहेत.
कॅप्टन शिवा चौहान
भारतीय युद्धभूमीवर महिलांचे शौर्य प्राचीन काळापासून दिसले आहे. पण जगातली सर्वात उंच आणि कठीण युद्धभूमी मानली गेलेल्या सियाचीन ग्लेशियर मध्ये नियुक्त केलेल्या कॅप्टन शिवा चौहान या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. भारतीय सैन्य दलात प्रत्यक्ष सीमेवर गस्तीपथकात महिला सैनिकांचा समावेश झाला आहेच. पण सर्वोच्च युद्धभूमीवर महिला अधिकाऱ्याची नियुक्ती अद्याप झाली नव्हती. ती कॅप्टन शिवा चौहान यांच्या रूपाने झाली आहे. भारतीय महिलांचा भारताच्या विकासात अग्रेसर राहून सहभाग असावा हे मोदी सरकारचे धोरण केवळ कागदावर नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून असे उतरल्याचे दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App