बीपीओ मध्ये काम करणाऱ्या महिलेला बॉयफ्रेंडच्या मोबाईल मध्ये आढळले तब्बल 13000 न्यूड फोटो!!; पोलीस कारवाई सुरू

वृत्तसंस्था

बेंगलुरु : अत्याधुनिक तंत्रज्ञानाने मानवी जीवन जेवढे आरामदायी केले आहे, तेवढेच ते गुंतागुंतीचे केले आहे. किंबहुना असुरक्षित केले आहे. याचे प्रत्यंतर बंगलोर मधल्या सिलिकॉन व्हॅलीत आले. तिथे एका बीपीओ कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणीला आपल्या बॉयफ्रेंडच्या मोबाईल गॅलरीत तब्बल 13000 न्यूड फोटो आढळले. त्यामुळे ती हादरली आणि तिने कंपनीच्या एच. आर. विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर हा मामला पोलिसांमध्ये पोहोचला. Woman finds 13,000 nude photos of herself, other women on boyfriend’s phone

बंगलोरच्या सिलिकॉन व्हॅलीत अनेक आयटी आणि बीपीओ कंपन्या आहेत. त्यापैकी एका कंपनीत काम करत असलेल्या एक 22 वर्षीय तरुणी त्याच कंपनीत काम करणाऱ्या आदित्य संतोष या युवकाबरोबर 4 महिने रिलेशनशिप मध्ये होती. यादरम्यान आदित्यने त्याच्या मोबाईल मध्ये तिचे काही प्रायव्हेट फोटो काढले होते. पण नंतर तिने आदित्यला ते फोटो डिलीट करायला सांगितले. परंतु त्याने ते डिलीट केले नाहीत. त्या युवतीने त्या युवकाबरोबरचे रिलेशनशिप संपवली. त्यानंतर तिने त्याचा मोबाईल चेक केला. त्यावेळी तिला तिच्या प्रायव्हेट फोटोंबरोबरच तब्बल 13000 तरुणींचे न्यूड फोटो आढळले. याचा तिला जबर धक्का बसला. त्यामुळे तिने आदित्यची तक्रार आपल्या कंपनीच्या एच. आर. विभागाकडे केली.

संबंधित कंपनीने आदित्य संतोषचा मोबाईल तपासल्यानंतर हा सायबर क्राईम असल्याचे स्पष्ट झाले आणि कंपनीच्या एच. आर. विभागाने बंगलोर पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दाखल घेऊन संबंधित आदित्य संतोष युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणात सायबर क्राईम पासून ते मानवी तस्करी पर्यंतच्या वेगवेगळ्या अँगलने तपास सुरू केला आहे.

Woman finds 13,000 nude photos of herself, other women on boyfriend’s phone

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात