PF मधून पैसे काढण्याचे नियम बदलले, आता 3 दिवसांत होईल EPF क्लेम सेटेलमेंट, जाणून घ्या प्रोसेस

Withdrawal rules from PF changed, now EPF claim settlement will happen in 3 days, know the process

EPF claim settlement : 6 कोटी ईपीएफओ सदस्यांसाठी चांगली बातमी आहे. आता पीएफ खात्यातून पैसे काढल्यानंतर तुमच्या खात्यात 3 दिवसांत पैसे येईल. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ईपीएफओने आपल्या ग्राहकांना भविष्य निर्वाह निधीतून आगाऊ पैसे काढण्याची परवानगी दिली आहे. त्याअंतर्गत सदस्यांना तीन महिन्यांचे मूळ वेतन (मूळ वेतन + महागाई भत्ता) किंवा त्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा होणाऱ्या रकमेपैकी 75 टक्के रक्कम जे काही कमी असेल ते काढून घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. Withdrawal rules from PF changed, now EPF claim settlement will happen in 3 days, know the process


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : 6 कोटी ईपीएफओ सदस्यांसाठी चांगली बातमी आहे. आता पीएफ खात्यातून पैसे काढल्यानंतर तुमच्या खात्यात 3 दिवसांत पैसे येईल. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ईपीएफओने आपल्या ग्राहकांना भविष्य निर्वाह निधीतून आगाऊ पैसे काढण्याची परवानगी दिली आहे. त्याअंतर्गत सदस्यांना तीन महिन्यांचे मूळ वेतन (मूळ वेतन + महागाई भत्ता) किंवा त्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा होणाऱ्या रकमेपैकी 75 टक्के रक्कम जे काही कमी असेल ते काढून घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. कामगार मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेदरम्यान आपल्या ग्राहकांना मदत करण्यासाठी ईपीएफओने आपल्या सदस्यांना दुसर्‍यांदा कोविड -19 अग्रिम घेण्यास परवानगी दिली आहे, ही रक्कम परत करण्याची गरज नाही.

कोरोनादरम्यान सदस्यांची आर्थिक गरज भागवण्यासाठी मार्च 2010 मध्ये पंतप्रधान गरीब कल्याण योजना (पीएमजीकेवाय) अंतर्गत विशेष पैसे काढण्याची तरतूद करण्यात आली. कर्मचार्‍यांच्या भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) गेल्या वर्षीच्या सुरुवातीच्या काळात साथीच्या आजारामुळे उद्भवलेल्या गरजा भागविण्यासाठी पैसे काढून घेण्यास परवानगी दिली होती.

काही दिवसांपूर्वीच सेवानिवृत्ती निधी व्यवस्थापन मंडळाच्या ईपीएफओने पीएफ खात्यातून कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पाच कोटींहून अधिक ग्राहकांना दिलासा मिळावा या उद्देशाने पीएफ खात्यातून दुसऱ्यांदा पैसे काढण्याची परवानगी दिली आहे.

ऑनलाइन पैसे काढण्याची प्रोसेस

1. EPFO पर लॉग इन करा.

2. Online Service वर Claim (फॉर्म-31, 19 आणि 10C) पर्याय निवडा.

3. सदस्याचा तपशील स्क्रीनवर झळकेल. आता तुम्हाला आपल्या खात्याचे शेवटचे चार अंक टाकून Verify बटणावर क्लिक करावे लागेल.

4. नियम अटी मानल्यानंतर Proceed Online Claim वर क्लिक करा.

5. यानंतर तुम्हाला पीएफ अॅडव्हान्स (Form 31) निवडावे लागेल. येथे तुम्हाला कारण निवडावे लागेल, तुम्ही अॅडव्हान्स पैसे का काढत आहात.

6. कारण स्पष्ट केल्यानंतर रक्कम आणि पूर्ण पत्ता मागितला जाईल. यानंतर फॉर्म सबमिट करा.

7. सर्व माहिती भरल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी येईल. ओटीपी भरल्यानंतर तुमचा क्लेम सबमिट होईल.

8- नियोक्त्याच्या अप्रूव्हलनंतर तुमच्या खात्यात पैसे येतील आणि तुम्ही ते सहज काढू शकाल.

रिटायरमेंट समूह ऑटो क्लेम सेटेलमेंट प्रोसेसमुळे प्रक्रिया पूर्वीपेक्षा खूप वेगवान झाली आहे. ज्यांनी आपले KYC डॉक्यूमेंट EPFOच्या वेबसाइटवर अपडेट केले आहेत, तेच या प्रक्रियेसाठी पात्र आहेत. श्रम मंत्रालयानुसार ऑटो सेटेलमेंटमुळे आता तीन दिवसांतच पैसे मिळू शकतील.

Withdrawal rules from PF changed, now EPF claim settlement will happen in 3 days, know the process

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात