Winter Session : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी 12 खासदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी लोकसभा आणि राज्यसभेतून वॉकआऊट केला. 23 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात राज्यसभेचे हे 12 खासदार सहभागी होऊ शकणार नाहीत. लोकसभेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांनी अनेक मुद्द्यांवरून गदारोळ सुरू केला. काँग्रेस, टीएमसी, आम आदमी पार्टी आणि इतर विरोधी पक्षांनी संसदेतील गांधी पुतळ्यासमोर निदर्शने केली. Winter Session Rajya Sabha and Lok Sabha proceedings adjourned till December 1, Opposition meets Lok Sabha Speaker
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी 12 खासदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी लोकसभा आणि राज्यसभेतून वॉकआऊट केला. 23 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात राज्यसभेचे हे 12 खासदार सहभागी होऊ शकणार नाहीत. लोकसभेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांनी अनेक मुद्द्यांवरून गदारोळ सुरू केला. काँग्रेस, टीएमसी, आम आदमी पार्टी आणि इतर विरोधी पक्षांनी संसदेतील गांधी पुतळ्यासमोर निदर्शने केली.
याआधी सोमवारी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कृषीविषयक तीन कायदे मागे घेण्याचे विधेयक दोन्ही सभागृहात चर्चेविना मंजूर करण्यात आले. सरकारने चर्चा न करताच हे कायदे मागे घेतल्याचा आरोप विरोधकांनी केला. या अधिवेशनात सरकार सुमारे 26 विधेयके मांडणार आहे, ज्यात वीज, पेन्शन, आर्थिक सुधारणांशी संबंधित किमान अर्धा डझन विधेयकांचा समावेश आहे.
Lok Sabha adjourned till tomorrow, 1st December. — ANI (@ANI) November 30, 2021
Lok Sabha adjourned till tomorrow, 1st December.
— ANI (@ANI) November 30, 2021
लोकसभेचे कामकाज उद्या १ डिसेंबरपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. तर विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाज बुधवारी सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. राज्यसभेच्या १२ खासदारांच्या निलंबनाविरोधात विरोधी पक्ष सातत्याने निदर्शने करत आहेत आणि ते रद्द करण्याची मागणी करत आहेत.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबत विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीनंतर हा गोंधळ संपला आहे. आता सभागृहाचे कामकाज विनाव्यत्यय चालणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या बैठकीत अधीर रंजन चौधरी, टीआर बालू, सौगता रॉय, कल्याण बॅनर्जी, सुप्रिया सुळे, पीव्ही मिधुन रेड्डी, नामा नागेश्वर राव, अनुभव मोहंती, पिनाकी मिश्रा, जयदेव गल्ला आणि इतर नेते उपस्थित होते.
दरम्यान, लोकसभेत एका लेखी उत्तरात गृह मंत्रालयाने सांगितले की, जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर एकूण 1678 स्थलांतरित पीएम विकास पॅकेज 2015 अंतर्गत नोकऱ्या घेण्यासाठी काश्मीरमध्ये परतले आहेत आणि 150 अर्जदारांना जमीन बहाल करण्यात आली आहे. गृह मंत्रालयाने सांगितले की, यावर्षी 15 नोव्हेंबरपर्यंत ईशान्य भागात बंडाशी संबंधित 187 घटना घडल्या आहेत. 15 नोव्हेंबरपर्यंत 20 नागरिक, 8 सुरक्षा दलाचे कर्मचारी आणि 39 बंडखोर मारले गेले आहेत.
12 निलंबित विरोधी खासदार त्यांचे निलंबन मागे घेण्यासाठी राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिणार आहेत. यासोबतच निलंबित खासदार उद्या संसदेतील गांधी पुतळ्यासमोर धरणेही देणार आहेत.
Winter Session Rajya Sabha and Lok Sabha proceedings adjourned till December 1, Opposition meets Lok Sabha Speaker
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App