विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Trump’s अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १ ऑगस्टपासून भारताच्या काही महत्त्वाच्या निर्यात वस्तूंवर २५% आयात शुल्क (टॅरिफ) लावण्याचा इशारा दिला आहे. यावर भारत सरकारने अधिकृत प्रतिक्रिया देत स्पष्ट केलं आहे की, देशाच्या राष्ट्रीय हिताचे संरक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जातील.Trump’s
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत यासंदर्भात सरकारची भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, “भारत आणि अमेरिका यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून परस्पर हिताचे, न्याय्य आणि संतुलित द्विपक्षीय व्यापार करारासाठी चर्चा सुरू आहे. आम्ही या उद्दिष्टासाठी कटिबद्ध आहोत. सरकारचे सर्वोच्च प्राधान्य हे शेतकरी, उद्योजक आणि MSME क्षेत्राचे हित जपणे आहे.”Trump’s
गोयल यांनी असेही नमूद केले की, जसे युकेसोबत सर्वंकष आर्थिक आणि व्यापार करत (Comprehensive Economic and Trade Agreement (CETA) अंतिम करण्यात आले, त्याच धर्तीवर भारत अमेरिका व्यापार संबंधांमध्येही संतुलन राखण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी राष्ट्रीय हिताशी कोणताही तडजोड केली जाणार नाही. भारत सरकारने या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून, कृषी, उद्योग, निर्यातदार व सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांवर (MSME) क्षेत्रावर परिणाम होणार नाही यासाठी रणनीती तयार केली जात आहे. अमेरिकेसोबतचे संबंध जपतानाच, देशाच्या आत्मनिर्भर धोरणालाही बाधा येणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.
सरकारच्या वक्तव्यानुसार, “भारतीय उत्पादकांचे नुकसान होऊ नये, देशाच्या व्यापार धोरणावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी सर्व पर्याय खुले ठेवण्यात आले आहेत. अमेरिकेसोबत विश्वासाच्या वातावरणात पुढील वाटचाल करण्यात येईल.”
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत भारतावर निशाणा साधला. त्यांनी आरोप केला की, “अमेरिकेचा भारताशी मोठा व्यापार तूट आहे आणि भारतातील उंच टॅरिफ तसेच अप्रत्यक्ष व्यापार अडथळे हे गंभीर मुद्दे आहेत. भारत रशियाकडून अजूनही संरक्षण सामग्री आणि ऊर्जा खरेदी करत आहे, जे अमेरिकेच्या दृष्टीने योग्य नाही.”
एप्रिल २०२५ मध्येही ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर २७% पर्यंत आयात शुल्क लागू करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर ही कारवाई थांबवण्यात आली होती आणि दोन्ही देशांमध्ये व्यापार करारावर चर्चा सुरू झाली होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App