बिहारमध्ये कन्हैयाचे लॉन्चिंग करून दिल्लीत तेजस्वीशी चर्चा; राहुलची डबल गेम भरणार का INDI आघाडीत ऊर्जा??

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : बिहारमध्ये कन्हैया कुमारचे लॉन्चिंग करून दिल्लीत तेजस्वी यादवशी चर्चा; राहुल गांधींची “डबल गेम” भरणार का INDI आघाडीत ऊर्जा??, असा सवाल राहुल गांधींच्या राजकीय कृतीतून समोर आलाय. कारण बिहारमध्ये राहुल गांधींनी काँग्रेस कडून कन्हैया कुमारचे लॉन्चिंग केले, तर नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी त्यांनी तेजस्वी यादवांशी चर्चा केली.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही घटनांना विशेष महत्त्व आहे. राहुल गांधींनी काहीच दिवसांपूर्वी बिहार मधल्या बेगूसरामध्ये विद्यार्थी आंदोलनात जाऊन तिथे बिहार मधल्या बाकीच्या काँग्रेसने त्यांना थोडे बाजूला ठेवत कन्हैया कुमारचे पॉलिटिकल लॉन्चिंग केले. बिहार प्रदेश काँग्रेसचे नेतृत्व दलित नेते राजेश कुमार यांच्याकडे दिले असले, तरी राहुल गांधींनी कन्हैया कुमारला हाताशी धरले. त्यामुळे बिहारच्या काँग्रेस मधले कन्हैया कुमारचे वर्चस्व वाढले. काँग्रेस बिहारमध्ये स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढविण्याचे वातावरण तयार केले.

पण आज राहुल गांधींनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी जाऊन तेजस्वी यादव आणि त्यांच्या राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांशी चर्चा केली. या चर्चेत काँग्रेस कडून खर्गे, राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे संघटन सचिव के. सी. वेणुगोपाल यांनी देखील भाग घेतला. आजच्या या चर्चेमुळे राहुल गांधींच्या “डबल गेम”ची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. एकीकडे कन्हैया कुमारचे लॉन्चिंग करायचे आणि दुसरीकडे तेजस्वी यादवांशी चर्चा करायची यातून राहुल गांधी INDI आघाडी राजकीय ऊर्जा भरू शकतील का?? आणि त्यांनी ऊर्जा भरलीच, तर ती सत्ताधारी
भाजप प्रणित NDA आघाडीवर मात करण्याइतपत पुरेशी ठरेल का??, याबद्दल शंका समोर आली.

Will Rahul Gandhi double game fill the energy in INDI lead?

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात