”छत्तीसगडमध्ये निवडणूक लढवणार नाही, पण भाजपचे सरकार आल्यास…” रामदास आठवलेंनी मांडली भूमिका!

भाजपचे ज्येष्ठ नेते रमणसिंग यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही सांगितले आहे.

विशेष प्रतिनिधी

रायपूर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (ए) प्रमुख आणि केंद्रीयमंत्री  रामदास आठवले हे कायमच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. रामदास आठवले यांनी आता छत्तीसगड विधानसभा निवडणुकीबाबत मजेशीर वक्तव्य केले आहे. छत्तीसगडमध्ये आमचा पक्ष निवडणूक लढवणार नाही, मात्र भाजपचे सरकार आल्यास आम्ही त्यात वाटा मागू, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. Will not contest elections in Chhattisgarh  Ramdas Athawale

रायपूरच्या प्रेस क्लबमध्ये गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत आरपीआय प्रमुख आठवले यांनी ही प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, ”छत्तीसगडमध्ये भाजपचे सरकार स्थापन होणार आहे. RPI(A) हा केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा भाग आहे. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत आठवले यांच्या पक्षाने राज्यात 7 जागा लढवल्या होत्या, परंतु सर्व जागांवर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.”

याचबरोबर ”आरपीआय (ए) एनडीएचा मित्रपक्ष आहे आणि राज्यातील सर्व 90 जागांवर भाजप उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे आम्ही छत्तीसगडमधील एकाही जागेवर निवडणूक लढवणार नाही. मात्र, राज्यात पुन्हा भाजपचे सरकार स्थापन झाले तर त्यात आमच्या पक्षालाही वाटा मिळायला हवा.”, असे सांगून आठवले म्हणाले की, माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रमणसिंग यांच्याशी भाजपमधील हिस्सेदारीच्या सूत्राबाबत मी बोलणार आहे.

Will not contest elections in Chhattisgarh  Ramdas Athawale

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात