वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्र सरकारने तयार केलेल्या माहिती तंत्रज्ञान कायद्यातील विशिष्ट तरतुदीनुसार जर एंड टू एंड एनक्रिप्शन नियम तोडायला लावला तर WhatsApp भारतात बंद होईल, असा इशारा मेटा कंपनीने दिल्ली हायकोर्टात दिला.will exit india if told to break encryption whatsapp to delhi high court
प्रत्यक्षात मेटा कंपनीने केंद्रातल्या मोदी सरकारने तयार केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान कायद्यालाच आव्हान दिले आहे. जागतिक पातळीवरच्या माहिती तंत्रज्ञान युगात आमच्यासारख्या जागतिक कंपनीला लागू होऊ शकत नाहीत, असा दावा मेटा कंपनीने दिल्ली हायकोर्टात करून WhatsApp भारतात बंद करण्याचा इशारा दिला.
एंड टू एंड एनक्रिप्शन मुळेच भारतातल्या तब्बल 40 कोटी ग्राहकांची माहिती खाजगी स्वरूपाचीच राहते. किंबहुना ती माहिती सार्वजनिक होऊ नये, हाच भारतीय ग्राहकांचा हेतू असल्याने ते WhatsApp शी जोडले गेले आहेत. पण जर मेटा कंपनीवर एंड टू एंड एनक्रिप्शन नियम तोडण्याचे बंधन घालण्यात आले तर मेटा कंपनी भारतातून WhatsApp बंद करून निघून जाईल, असा दावा कंपनीने दिल्ली हायकोर्ट केला. सोशल मीडियात या संदर्भात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App