पोलिसांचा खळबळजनक खुलासा, जाणून घ्या आणखी माहिती
विशेष प्रतिनिधी
मुंबई : Karnataka कर्नाटकचे माजी पोलिस महासंचालक (डीजीपी) ओम प्रकाश यांच्या हत्या प्रकरणात एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. पोलिस तपासानुसार, ओम प्रकाश याची पत्नी पल्लवीने तिच्या पतीवर चाकूने वार करण्यापूर्वी त्यांच्या चेहऱ्यावर मिरची पावडर फेकल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी पल्लवी आणि तिची मुलगी कृती यांना मुख्य संशयित म्हणून अटक केली आहे. Karnataka
१९८१ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी ओम प्रकाश हे रविवार, १९ एप्रिल २०२५ रोजी बंगळुरू येथील त्यांच्या निवासस्थानी मृतावस्थेत आढळले. एचएसआर लेआउटमधील त्यांच्या तीन मजली घराच्या तळमजल्यावर त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओम प्रकाश आणि त्यांच्या पत्नीमध्ये झालेल्या जोरदार वादानंतर पल्लवीने प्रथम त्यांच्या चेहऱ्यावर मिरची पावडर फेकली, ज्यामुळे ते चिडून इकडे तिकडे धावत होते. त्यानंतर पल्लवीने त्यांच्यावर चाकूने अनेक वार केले, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
सूत्रांनी सांगितले की, घटनेनंतर पल्लवी हिने तिच्या मैत्रिणीला व्हिडिओ कॉल केला आणि म्हणाली, “मी राक्षसाला मारले आहे.” पोलिस तपासात असेही आढळून आले की या जोडप्यामध्ये वारंवार भांडणे होत होती आणि त्यांचे नाते ताणले गेले होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App