विशेष प्रतिनिर्धी
नवी दिल्ली : बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौटविरुध्द याचिका दाखल करणाºया वकीलाला सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच सुनावले अहे. तुम्ही कशाला तिच्या विधानांना प्रसिध्दी देता असा सवालही न्यायालयाने केला आहे. तुम्ही जितकी तिची प्रसिध्दी कराल तिला तेवढाच फायदा होईल. त्यामुळे सतत अशा प्रकारे प्रसिध्दी करणे सोडा,असेही न्यायालयाने म्हटले आहे.Why do you publicize her statements? The lawyer who filed the petition against Kangana Ranaut was heard by the Supreme Court
कंगनाच्या सोशल मीडियातील विधानांवर सेन्सॉरशिपची मागणी करणारी शीख वकील चरणजीत सिंग चंद्रपाल यांनी दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांच्या खंडपीठाने सुचवले की याचिकाकर्त्याने एक तर कंगनाने केलेल्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करावे किंवा तिच्यावर कायदेशिर कारवाई करावी.
शेतकरी आंदोलनाच्या काळात कंगनाने केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टचा संदर्भ याचिकाकर्त्यांनी दिला आहे. त्यामध्ये कंगनाने म्हटले होते की आज खलिस्तानी दहशतवादी आज सरकारला त्रास देत आहेत. परंतु आपण एका महिलेला विसरू नका. देशातील एकत्र महिला पंतप्रधानाने यांना आपल्या बुटाखाली चिरडले होते.
तिने या देशाला कितीही त्रास दिला तरीही तिने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता मच्छरांप्रमाणे त्यांना चिरडले. देशाचे तुकडे होऊन दिले नाहीत. त्यामुळेच तीन दशकानंतरही तिचे नाव ऐकल्यावर ते थरथर कापतात. त्यामुळे यांना अशाच गुरूची गरज आहे.
याचिकाकर्ते चंद्रपाल यांच्या म्हणण्यानुसार कंगनाच्या या अपमानकारक विधानामुळे शिख शेतकरी खलिस्तानी दहशतवादी होते असे चित्रित करण्याचा प्रयत्न आहे. आम्ही गुरुद्वारांमध्ये जातो, जेव्हा आम्ही तिथे सामान्य शिखांसोबत बसतो. त्यावेळी कोण खलिस्तानी आणि कोण शीख यात फरक करत नाहीत.
सामान्य भारतीय माणसाला हे समजते असे तुम्हाला वाटत नाही का? असा सवाल खंडपीठाने केला. चंद्रपाल यांनी कंगनाच्या विरोधात दाखल केलेल्या अनेक एफआयआर एकत्र करण्याची मागणी केली. त्यावर तुम्ही कोण आहात असा सवाल करत न्यायालयाने म्हटले आहे की तुम्हाला एका बाजुला सर्व एफआयआर एकत्र करायचे आहेत आणि दुसऱ्या बाजुला फक्त खार पोलिसांनी तपास केला पाहिजे? असे तुम्ही म्हणता. हे सर्व करणारे तुम्ही कोण आहात? तुम्ही आरोपी नाही, तुम्ही तक्रारदार नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App