Rahul Gandhi : गुजरात काँग्रेसवर का भडकले राहुल गांधी?, म्हणाले- या लोकांना काढून टाकावे लागेल!

Rahul Gandhi

प्रतिनिधी

अहमदाबाद : Rahul Gandhi काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी अहमदाबाद येथे पक्षातील नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, गुजरातमध्ये काँग्रेस पक्षाला योग्य दिशा दाखवता आलेली नाही.Rahul Gandhi

गुजरात काँग्रेसमध्ये दोन गट – एक जनतेशी जोडलेले, दुसरे भाजपप्रणीत

राहुल गांधी म्हणाले की, गुजरात काँग्रेसमध्ये दोन प्रकारचे लोक आहेत. पहिला गट – जे जनतेच्या बाजूने आहेत आणि काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास ठेवतात. दुसरा गट – जो जनतेपासून तुटलेला आहे, त्यातील अनेक जण भाजपशी हातमिळवणी करून बसले आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत या दोन गटांमध्ये विभाजन केले जात नाही, तोपर्यंत गुजरातची जनता काँग्रेसवर विश्वास ठेवणार नाही.



१०, १५, २०, ३० लोकांना बाहेर काढावे लागले तरी हरकत नाही

कार्यकर्ता संवाद कार्यक्रमात राहुल गांधींनी थेट पक्षातील बंडखोरांवर निशाणा साधत कठोर भूमिका घेतली. ते म्हणाले, “जर भाजपसाठी पक्षात राहून काम करणारे लोक आहेत, तर त्यांना थेट बाहेर काढले पाहिजे. गरज पडल्यास १०, १५, २०, ३० लोकांना पक्षातून बाहेर टाकले पाहिजे.” त्यांनी स्पष्ट केले की, हे लोक भाजपला मदत करत असतील, तर त्यांनी थेट बाहेर जावे, कारण भाजप त्यांनाही सहज स्वीकारणार नाही.

‘गुजरातच्या जनतेला काँग्रेसकडून ठोस पर्याय हवा’

राहुल गांधी म्हणाले, “गुजरातची जनता पर्याय शोधत आहे, पण त्यांना भाजपची ‘बी टीम’ नको आहे. आमच्याकडे उत्तम नेतृत्व आहे, पण मागे अडवून ठेवले जात आहे.” त्यांनी कार्यकर्त्यांना जाणीव करून दिली की, जर पक्षाला मजबूत करायचे असेल, तर योग्य आणि प्रामाणिक लोकांना पुढे आणावे लागेल.

‘गुजरातने काँग्रेसला महात्मा गांधी दिले, पण आज आम्ही दिशाहीन’

राहुल गांधींनी काँग्रेसच्या ऐतिहासिक योगदानाची आठवण करून देत सांगितले की, “गुजरातनेच महात्मा गांधींसारखा नेता दिला, ज्याने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. पण आज आम्ही गुजरातला दिशाच दाखवू शकत नाही, हे दुर्दैवी आहे.”

‘केवळ निवडणुकीचा विषय नाही, जबाबदारीची जाणीव हवी’

राहुल गांधी म्हणाले, “गेल्या ३० वर्षांत आम्ही गुजरातमध्ये सत्ता मिळवू शकलेलो नाही. फक्त निवडणुकीबाबत बोलून काही होणार नाही. आम्हाला गुजरातच्या जनतेशी प्रामाणिकपणे नातं जोडावं लागेल.” त्यांनी हे देखील नमूद केले की, काँग्रेसने जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत, त्यामुळे आता पक्षाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.

‘विपक्षाकडे ४०% मते आहेत, पण संघटनेची गरज’

राहुल गांधींनी असेही सांगितले की, “गुजरातमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात मोठी लढत आहे. विरोधकांकडे ४०% मते आहेत, पण आम्ही त्याचा फायदा घेत नाही. जर पक्ष संघटित झाला, तर सत्ता दूर नाही.”

‘गुजरातमध्ये आलो की वजन वाढते, पण पक्षासाठी मेहनत कमी होणार नाही’

आपल्या शैलीदार भाषणात राहुल गांधींनी हलक्याफुलक्या शब्दांत कार्यकर्त्यांना जोडण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, “मी वजन कमी करण्याचा प्रयत्न करतो, पण जेव्हा गुजरातमध्ये येतो, तेव्हा मला असे ठिकाणी नेले जाते की, माझे वजन १ किलो वाढते!”

राहुल गांधींचा स्पष्ट संदेश – पक्षासाठी कठोर निर्णय घ्यावेच लागतील

या भाषणातून राहुल गांधींनी पक्षातील नेत्यांना स्पष्ट संदेश दिला की, आता काँग्रेसला नवीन उर्जा देण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील. भाजपशी हातमिळवणी करणाऱ्या नेत्यांना तात्काळ पक्षाबाहेर काढून काँग्रेसचे मूळ बळकट करावे लागेल, तरच गुजरातमध्ये पक्ष पुन्हा उभा राहू शकेल.

Why did Rahul Gandhi get angry at Gujarat Congress? He said – These people need to be removed!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात