”काँग्रेसने मागास समाजातील चरणसिंग यांना पंतप्रधान म्हणून संसदेला सामोरे जाऊ दिले नाही आणि…” असंही म्हणाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
पाटणा : बिहारमधील जातीय जनगणनेवरून राजकीय वादंग सुरू आहे. आता जेडीयू नेते नीरज कुमार यांनी पंतप्रधान मोदींच्या जातीबाबत वादग्रस्त टिप्पणी केली, ज्यावरून भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपा नेत्यांकडून मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला जात आहे. तर राज्यसभा खासदार सुशील मोदींनीही टीका करत म्हटले की, कधी राहुल गांधींची जात का नाही विचारली गेली? Why did not you ask Rahul Gandhis caste Sushil Modi asked JDU RJD after asking PM Modis caste
खासदार सुशील मोदी म्हणाले की, कोणताही मुद्दा नसल्याने विरोधी पक्ष आता पंतप्रधान मोदींच्या मागास जातीचा आणि त्यांच्या माता-पित्यांच्या गरिबीची थट्टा करत आहे. त्यांच्यात सरकारच्या कल्याणकारी निर्णयांवर चर्चा करण्याची हिंमत नाही.
सुशील मोदी म्हणाले की, ९ वर्षांनंतर जे पंतप्रधान मोदींच्या जातीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत, त्यांनी राहुल गांधींची जात का विचारली नाही? ते पुढे म्हणाले की काँग्रेसने मागास समाजातील चरणसिंग यांना पंतप्रधान म्हणून संसदेला सामोरे जाऊ दिले नाही आणि एचडी देवेगौडा यांचे सरकार केवळ ११ महिन्यांत पाडले. काँग्रेसच्या मांडीवर बसलेल्या जेडीयू-आरजेडीसारख्या प्रादेशिक पक्षांनाही मागासवर्गीयातून आलेले नरेंद्र मोदी सहन होत नाहीत.
ते म्हणाले की, मागास समाजातील व्यक्ती पहिल्यांदाच पंतप्रधान झाली, जी काँग्रेसच्या आशीर्वादावर अवलंबून नाही. मागास, अतिमागास आणि दलित समाजातील कोट्यवधी गरीब लोकांसाठी ते 9 वर्षांपासून रजा न घेता काम करत आहेत. यावर बोलायला नको का?
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App