विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने कंबर कसून भाजपशी खऱ्या अर्थाने टक्कर घेण्यासाठी संघ परिवाराच्या बालेकिल्ल्यात घुसून नागपुरातून रणशिंग फुंकण्याचा निश्चय केला आहे. त्यासाठी त्यासाठी पक्षाने आपल्या स्थापना दिवसाचा मुहूर्त निवडला आहे. काँग्रेसच्या स्थापना दिवशी 28 डिसेंबरला काँग्रेस नागपुरात महारॅली करणार आहे. पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त अशी महारॅली करणे किंवा कोणता सामाजिक उपक्रम करणे त्यात विशेष काही नाही.Why crowd funding for Congress “now”??; what’s the connection of 350 cr. with this??
पण 138 व्या वर्धापन दिनानिमित्त काँग्रेसने 10 दिवसांची जी योजना आखली आहे, ती मात्र निश्चित वेगळी आणि अनेकांच्या राजकीय भुवया उंचावणारी आहे. ती योजना म्हणजे काँग्रेस लोकसभा निवडणुकीच्या निधीसाठी क्राऊड फंडिंग करणार आहे. त्यासाठी काँग्रेसने 18 डिसेंबर ते 28 डिसेंबर हा कालावधी निवडला आहे. संपूर्ण देशभर काँग्रेस कार्यकर्ते फिरून आणि वेगवेगळ्या माध्यमांमधून सामान्य जनतेकडून पक्षासाठी निधी गोळा करणार आहेत. त्यासाठी पक्षाने 138, 1038 आणि 10,038 आणि त्या पटीत देणग्या मागितल्या आहेत. काँग्रेसच्या नेत्यांनी यासाठी महात्मा गांधींनी 1921 मध्ये केलेल्या टिळक स्वराज्य फंडाची आठवण काढली आहे. टिळकांचे नाव आणि महात्मा गांधींचा उपक्रम या नैतिक आधाराच्या बळावर काँग्रेसने तब्बल 102 वर्षानंतर अशा क्राऊड फंडिंगची योजना आखली आहे. वरवर पाहता तिचे टिळक स्वराज्य फंडाशी निश्चित कनेक्शन जोडता येऊ शकेल, पण त्या पलीकडे जाऊन गेल्या 102 वर्षांमध्ये किंवा अगदी नजीकच्या इतिहासात काँग्रेसने असे क्राऊड फंडिंग का केले नाही??, हा सवाल मात्र उपस्थित होतो आहे.
वास्तविक फार पूर्वी काँग्रेसकडे सदस्यत्वाची चार आणे योजना होती. देशातला कोणीही व्यक्ती चार आणे भरून काँग्रेसचा सदस्य होऊ शकत असे. ही योजना वर्षानुवर्षे चालली. काही काळाने तिची चेष्टाही व्हायला लागली.
आचार्य अत्रे यांनी त्यावर विडंबन काव्य केले होते,
*मला सज्जना चार आण्यात फक्त तुला व्हायचे असे देशभक्त तरी सांगतो शेवटी युक्ती सोपी खिशामाजी ठेवी सदा गांधी टोपी!!*
या विडंबन काव्यातून आचार्य अत्र्यांनी काँग्रेसच्या चार आणि सभासत्वाची खिल्ली उडवली होती.
पण आता काँग्रेसने महात्मा गांधींच्या टिळक स्वराज्य फंडातून प्रेरणा घेत क्राऊड फंडिंगचा मनसूबा आखला आहे. त्या मागचे नेमके “राजकीय रहस्य” काय आहे?? याविषयी दिल्लीच्या राजकीय वर्तुळात एक वेगळीच चर्चा सुरू आहे.
– धीरज साहू 350 कोटी कनेक्शन
काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या कंपन्यांमध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने घातलेल्या छाप्यांमध्ये तब्बल 350 रुपये आढळून आले. नोटांनी भरलेली कपाटे आणि खोकी पाहून इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांचेच डोळे विस्फारले. धीरज प्रसाद साहू यांच्या ठिकाणांवरचे छापे संपलेले नाहीत. उलट त्यांनी बंगल्यांच्या जमिनीखाली काही संपत्ती पुरून ठेवली आहे का??, याचीही याचाही शोध घेतला जात आहे. काँग्रेसच्या क्राऊड फंडिंगशी नेमके याचेच कनेक्शन जुळत असल्याचे बोलले जात आहे. कारण धीरज प्रसाद साहू यांच्याकडे आढळलेले 350 कोटी रुपये आणि काँग्रेसचे क्राऊड फंडिंग यांचे टायमिंग बरोबर जुळते आहे.
आता धीरज प्रसाद साहू यांनी ठेवलेले 350 कोटी रुपये तर गेले. त्यांच्या पाठोपाठ अजून कोणी काँग्रेस नेते अथवा खासदार इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या रडारवर आहेत का??, या याविषयी काँग्रेसच्या अंतर्गत वर्तुळात भीती निर्माण झाली आहे. कारण काँग्रेसच्या कुठल्याही नेत्यांनी अथवा खासदारांनी 50 – 100 कोटी रुपयांची रक्कम जर आपल्या कुठल्या कंपनीत, घरात अथवा अन्यत्र कुठे दडवून ठेवली असेल आणि तिच्यावर छापे पडले तर ते पैसे उघड्यावर येऊन काँग्रेस नेतेच पुरते अडचणीत सापडतील. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही अडचण साधीसुधी उरली नसून अत्यंत धोकादायक बनली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी अथवा खासदारांनी वेगवेगळ्या निवडणुकांसाठी गोळा केलेली आणि दडवून ठेवलेली रक्कम उघडपणे क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून पक्षाच्या खात्यात जमा करण्याची “कल्पनेची आयडिया” काही काँग्रेस नेत्यांनी लढवली आहे.
पक्षाच्या नेत्यांनी दडवून ठेवलेल्या मोठमोठ्या रकमा आपल्याच स्वयंसेवकांना, कार्यकर्त्यांना, छोट्या मोठ्या नेत्यांना वाटून किंवा वेगवेगळ्या माध्यमातून पावत्या देऊन देणग्या घेण्याची ही “आयडिया” आहे. पक्षाला मिळालेल्या देणग्या इन्कम टॅक्सच्या विशिष्ट सवलतीतून वाचतात हा कायदेशीर आधारही त्याला जोडण्याचा प्रयत्न आहे.
त्यामुळे एकतर जो काही पैसा काँग्रेसच्या नेत्यांनी अथवा खासदारांनी दडवून ठेवला असेल तो उघडपणे बाहेर काढता येऊ शकेल. तो एकत्रित असणार नाही. तो वेगवेगळ्या देणग्यांमार्फत पक्षाच्या खात्यात जमा होऊ शकेल आणि उर्वरित रक्कम तरी वाचेल हा काँग्रेसच्या नेत्यांचा होरा आहे. पण यासाठी काँग्रेसने 10 दिवस दिले आहेत. याचा अर्थ 10 दिवसांत हा दडवून ठेवलेला पैसा पक्षाच्या खात्यात विविध मार्गांनी जमा करण्याची ही योजना आहे.
अर्थात ही योजना काँग्रेस नेत्यांना कितीही भारी वाटत असली, तरी त्यामुळे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे काम थांबण्याची सूतराम शक्यता नाही. धीरज प्रसाद साहू यांच्या कंपन्या आणि घरांच्या झडत्या थांबणार नाहीत किंवा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या रडारवर काँग्रेसचे कोणी नेते अथवा खासदार असतील, तर तेही रडारवरून दूर जाण्याची बिलकूल शक्यता नाही. पण ही शक्यता गृहीत धरूनही एक “एस्केप रूट” म्हणून काँग्रेसने “अचानक” क्राऊड फंडिंगची “आयडियेची कल्पना” लढवली असल्याची चर्चा आहे.
आता ही “आयडियेची कल्पना” यशस्वी होईल की इन्कम टॅक्स डिपार्टमेंट अथवा दुसरी कोणती तपास यंत्रणाच काँग्रेसच्या त्या योजनेत खोडा घालून ती उलटवू टाकेल??, हे आगामी 10 दिवसांमध्ये समजून येणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App