पंडित नेहरूंचा सेंगोल – राजदंड वारसा काँग्रेसने आत्तापर्यंत दडवून ठेवलाच का??

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचे 28 मे 2023 रोजी सावरकर जयंती दिली उद्घाटन होत असताना एक वेगळाच आयाम त्याला जोडला जात आहे आणि तो खऱ्या अर्थाने भारतीय परंपरा जपणारा आणि विद्यमान राजकीय वादविवादाच्या पलीकडे जाणार आहे, तो म्हणजे पंतप्रधान मोदी भारतीय परंपरेतील सम्राट चोल यांच्या राजवंशीय सेंगोल अर्थात राजदंड नवीन संसद भवनात प्रतिष्ठापित करत आहेत. Why Congress kept in dark the great legacy of pt. Nehru of accepting Sengol – Scrptre for 75 years of independence??

हा तोच सेंगोल राजदंड आहे, जो पंडित जवाहरलाल नेहरूंनी तमिळ पंडितांच्या हस्ते 14 ऑगस्ट 1947 रोजी समारंभ पूर्वक स्वीकारला होता. ब्रिटिश राजसत्तेकडून भारतीय प्रतिनिधींकडे सत्ता हस्तांतराचा तो अनमोल प्रतीक आहे. हा सेंगोल अर्थात राजदंड एव्हाना राष्ट्रपती भवन, जुने संसद भवन किंवा पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान येथे सन्मानपूर्वक विराजित व्हायला हवा होता. पण तसे घडले नाही.

इतके झाले पंतप्रधान, पण…!!

14 ऑगस्ट 1947 नंतर हा सेंगोल अर्थात राजदंड विस्मृतीत गेला. त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू तब्बल 17 वर्षे भारताचे पंतप्रधान राहिले. त्याच्यानंतर लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, मोरारजी देसाई, चरण सिंग, राजीव गांधी, विश्वनाथ प्रताप सिंह, चंद्रशेखर, पी. व्ही. नरसिंह राव, एच. डी. देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, अटल बिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंग आणि आता नरेंद्र मोदी एवढे पंतप्रधान झाले. काँग्रेस – भाजप – पुन्हा काँग्रेस – भाजप – पुन्हा भाजप अशा राजवटी आल्या आणि गेल्या. पण या सेंगोल अर्थात राजदंडाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खेरीज एकाही पंतप्रधानाला आठवण झाली नाही आणि आठवण झाली असल्यास त्यांनी त्याचा कधी उल्लेख अधिकृतरित्या उल्लेख केल्याचे इतिहास सांगत नाही.

मग हा सेंगोल राजदंड एवढा विस्मृतीत का गेला आणि कसा गेला??

गेल्या 75 वर्षांच्या इतिहासात बहुतांश म्हणजे साधारण 50 ते 55 वर्षे राजवट काँग्रेसचीच होती. त्यातही संपूर्णपणे नेहरू – गांधी परिवाराचा त्यावर प्रभाव होता. ज्या पंडित नेहरूंनी भारतीय परंपरेतला सेंगोल स्वतः स्वीकारला होता, तो विस्मृतीत जाणे काँग्रेसच्या नेहरू – गांधी परिवारालाच अपेक्षित होते का?? असे काय कारण घडले की हा सेंगोल राजदंड गेली 75 वर्षे विस्मृतीत राहिला?? काँग्रेसने नेहरूंची प्रतिमा फक्त धर्मनिरपेक्ष रंगविणे या कारणास्तव ही भारतीय परंपरा नाकारली का??, स्वतः नेहरूंना ही परंपरा मनापासून नको होती का??, इतिहास नेमके काय सांगतो आहे?? हे मूलभूत प्रश्न आहेत.

हा सेंगोल राष्ट्रपती भवन, जुने संसद भवन किंवा पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान येथे विराजमान राहिला असता, तर भारताच्या धर्मनिरपेक्ष ढाच्याला अशी कोणती हानी पोहोचत होती की ज्यामुळे काँग्रेसने दस्तूर खुद्द नेहरूंचा हा वारसा नाकारला??, हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे, किंबहुना सर्वात कळीचा आहे!!

ब्रिटिश राजसत्तेचे हस्तांतर भारतीय परंपरा स्वीकारून झाले हे इतिहासात नमूद व्हावे, हे नेहरू आणि गांधी परिवाराला मान्य नव्हते का?? की स्वातंत्र्यानंतरच्या त्यांच्या राजकीय – सामाजिक भूमिकांना ते सोयीचे नसल्यामुळे हा सनातन भारतीय हिंदू परंपरेतला सेंगोल राजदंड इतिहासाच्या अडगळीत टाकण्यात आला??, या प्रश्नांची उत्तरे आता जनतेने मागितली पाहिजेत.

नेहरूंची मूलभूत वैचारिक धाटणी

नेहरू हे स्वातंत्र्य लढ्यात खादीचा पोशाख जरूर घालायचे. नंतरही त्यांनी भारतीय सुरुवार आणि शेरवानी हा पोशाख स्वीकारला. पण त्यांची मूलभूत वैचारिक धाटणी पाश्चात्त्यच राहिली. पाश्चात्य लोकशाही विचार प्रणालीचा त्यांच्यावर विलक्षण प्रभाव होता. ब्रिटिश लोकशाही परंपरांविषयी त्यांना सर्वात जास्त आदर होता. ते तो अनेकदा बोलूनही दाखवत असत. नेहरूंच्या या ब्रिटिशनिष्ठ लोकशाही विचारांमधूनच सनातन हिंदू भारतीय परंपरेतला सेंगोल इतिहासाच्या अडगळीत टाकला गेला का??, हा सवाल गंभीर आहे. याचे खरे उत्तर मिळाले पाहिजे.

पण त्या पलीकडे जाऊन एक बाब आणखी महत्त्वाची आहे, ती म्हणजे नेहरू – गांधी परिवाराची राजकीय गैरसोय समजू शकते. पण त्यानंतर देखील नरसिंह राव आणि अटल बिहारी वाजपेयी हे पूर्णपणे भारतीय परंपरांना मनापासून मानणारे पंतप्रधान असताना देखील या सेंगोल राजदंडाकडे का आणि कसे दुर्लक्ष झाले?? बाकीचे पंतप्रधान हे नेहरू – गांधी परिवाराच्या छाये बाहेरचे असले तरी चंद्रशेखर हा अपवाद वगळता भारतीयत्वाच्या व्यापक भावनेपासून ते देखील दूर होते. त्यांना देखील या सेंगोल राजदंडाची आठवण झाली नव्हती, ही वस्तुस्थिती आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंडित नेहरूंनी स्वीकारलेल्या सेंगोलची प्रतिष्ठापना नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने 28 मे 2023 सावरकर जयंतीदिनी करणार आहेत. एक विलक्षण राजकीय योगायोग यातून साधला जात आहे. नेहरू – सावरकर – मोदी असा हा “संगम” आहे. पण यानिमित्ताने मुळात काँग्रेसने सिंगुल राजदंडाची उज्ज्वल परंपरा आत्तापर्यंत का दडवून ठेवली होती??, या प्रश्नाचे उत्तर मात्र मिळालेच पाहिजे.

*सेंगोलवर तामिळ भाषेतील हा श्लोक कोरलेला आहे :

हा आपला आदेश आहे की भगवान (शिव), राजा, स्वर्गात जसे राज्य करतो, तसे या राजाने पृथ्वीवर राज्य करावे.*

Why Congress kept in dark the great legacy of pt. Nehru of accepting Sengol – Scrptre for 75 years of independence??

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात