वृत्तसंस्था
नवी दिल्ली : घाऊक महागाई लागोपाठ तिसऱ्या महिन्यात (जूनमध्ये) शून्याखाली आली आहे. म्हणजेच घाऊकमध्ये दर वाढण्याऐवजी घटले आहेत. खाद्य पदार्थ, इंधन आणि मूलभूत धातुंचे दर कोसळल्यामुळे गेल्या महिन्यात घाऊक महागाईचा दर सुमारे ८ वर्षांच्या निचांकी पातळी (-)४.१२ टक्क्यांवर आला आहे.Wholesale inflation at an eight-year low, below zero for the third month in a row
अधिकृत आकडेवारीनुसार, घाऊक मूल्य निर्देशांक आधारित महागाई मे महिन्यात (-)३.४८% व जून २०२२ मध्ये १६.२३% होती. घाऊक महागाईचा दर सर्वात कमी ऑक्टोबर २०१५ मध्ये (-)४.७६% होता. घाऊक महागाईत घसरण जूनच्या किरकोळ महागाईच्या उलट आहे. ती मे महिन्यातील ४.३% वरून जूनमध्ये ४.८% झाली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानुसार, जूनमध्ये घाऊक महागाई शून्याखाली आल्याचे प्रमुख कारण खाद्य पदार्थ, मूलभूत धातू, कच्चे तेल, नैसर्गिक गॅस आणि कपड्यांच्या किमतींमधील घसरण आहे.
जूनमध्ये किरकोळ महागाई 4.81 टक्क्यांवर; खाद्यपदार्थ महागले
जून महिन्यात किरकोळ महागाई 4.81 टक्क्यांवर पोहोचली आहे. मे महिन्यात ती 4.25 टक्क्यांच्या 25 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली होते. जूनमध्ये भाज्यांचे भाव वाढल्याने महागाई वाढली. मान्सूनच्या असमान पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असून, भावात वाढ झाली आहे.
जूनमध्ये ग्राहक अन्न किंमत निर्देशांक 4.49% पर्यंत वाढला. मे महिन्यात तो 2.96% होता. तर एप्रिलमध्ये तो 3.84% होता. हा निर्देशांक खाद्यपदार्थांच्या किमतीतील वाढ आणि घट दर्शवतो. सीपीआय बास्केटमध्ये अन्नपदार्थांचा वाटा जवळपास निम्मा आहे.
जून महिन्यात महागाई वाढली असेल, पण ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणजेच आरबीआयच्या 6% सहनशीलतेच्या मर्यादेपेक्षा कमी आहे. RBI ची महागाईची उच्च सहनशीलता मर्यादा संपूर्ण आर्थिक वर्षासाठी 6% च्या खाली राहण्याची शक्यता आहे. महागाईसाठी RBI ची कमी सहनशीलता मर्यादा 2% आहे.
शहरी महागाई वाढून 4.96% (MoM) वर पोहोचली ग्रामीण महागाई वाढून 4.72% (MoM) वर मे महिन्यात महागाई 4.25 टक्क्यांवर
मे महिन्यात किरकोळ महागाई दर 4.25 टक्क्यांवर आला होता. ही 25 महिन्यांतील नीचांकी पातळी होती. एप्रिल 2021 मध्ये महागाई 4.23% होती. महागाईतील ही घट खाद्यपदार्थांच्या किंमतीत घट झाल्यामुळे झाली आहे. यापूर्वी एप्रिल 2023 मध्ये महागाई 4.70% होती.
महागाईची चिंता आणि अनिश्चितता कायम
जूनमध्ये झालेल्या पतधोरण बैठकीबाबत माहिती देताना आरबीआय गव्हर्नर म्हणाले होते की, महागाईची चिंता आणि अनिश्चितता अजूनही कायम आहे. दुसरीकडे, नेत्रा अहवालाच्या जुलै आवृत्तीमध्ये, अन्नधान्य महागाईत वाढ ही एक हंगामी घटना आहे आणि ती आटोक्यात आणण्याजोगी असल्याचे म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App