Chandrayaan-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरताच पंतप्रधान मोदींनी सर्वात अगोदर कोणाला फोन केला?


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारताने नवा इतिहास रचला आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरले आहे. इस्रोने सांगितले की चांद्रयान-3 चे लँडर विक्रमने संध्याकाळी 6.04 वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवले.  कोट्यवधी भारतीयांबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदीही या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले आहेत. पंतप्रधान मोदी दक्षिण आफ्रिकेतून इस्रोशी व्हर्चुअली जोडले गेले होते. या ऐतिहासिक यशाबद्दल त्यांनी देशवासियांचे आणि इस्रोचे अभिनंदन केले आहे. चांद्रयान-3 सॉफ्ट लँडिंग पाहिल्यानंतर लगेचच पंतप्रधान मोदींनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) चे प्रमुख एस. सोमनाथ यांना पहिला फोन केला. या यशाबद्दल पंतप्रधानांनी इस्रो प्रमुख आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान मोदी ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत गेले असून ते जोहान्सबर्गमध्ये आहे. Who was the first person Prime Minister Modi called after Chandrayaan 3 landed on the South Pole of the Moon

प्रोत्साहनाबद्दल इस्रोने पंतप्रधान मोदी आणि देशवासीयांचे आभार मानले आहेत. दरम्यान, बेंगळुरूमधील इस्रोच्या मिशन कमांड सेंटरचा एक व्हिडिओ समोर आला आहे. चांद्रयान-3 चंद्रावर उतरताच शास्त्रज्ञांचा आनंद आणि अभिमान दोन्ही व्हिडिओमध्ये दिसत आहे.

या यशाबद्दल इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी त्यांच्या टीमचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशवासीयांचेही त्यांनी आभार मानले. ते म्हणाले, “आपण चंद्रावर पाऊल ठेवले आहे. चंद्रावर ‘सॉफ्ट लँडिंग’ करण्यात आपण यशस्वी झालो आहोत, भारत चंद्रावर आहे. आपण चांद्रयान 1 ने प्रवास सुरू केला तो आता चांद्रयान 3 पर्यंत पोहोचला आहे. असे सांगून त्यांनी सर्वांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले.” विशेष बाब म्हणजे यादरम्यान इस्रो प्रमुखांनी त्यांच्या टीमला बोलण्याची संधी दिली.

Who was the first person Prime Minister Modi called after Chandrayaan 3 landed on the South Pole of the Moon

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात