नाशिक : केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून संविधानाला धोका असल्याचा ढोल काँग्रेस, कम्युनिस्ट आणि बाकीच्या सगळ्या विरोधी पक्षांनी पिटला. प्रत्यक्षात असा कुठलाही धोका कुठे निर्माण झाल्याचे किंवा सुप्रीम कोर्टाने तसे ताशेरे ओढल्याचे कुठे दिसले नाही. पण म्हणून विरोधकांनी आपल्या भाषणांमध्ये संविधानाला धोका असल्याचा narrative तयार करणे थांबविले नाही.Who is the threat to the Indian Constitution??; Read what Dr. Babasaheb Ambedkar had said!!
या पार्श्वभूमीवर आजच्या संविधान दिनी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नेमके काय म्हटले होते, त्यांनी भाषणात नेमका कुणाचा उल्लेख केला होता??, संविधानाला धोका असलाच, तर तो कुणापासून आहे??, याचा शोध घेतल्यानंतर वेगळेच राजकीय वास्तव समोर आले. संविधानाला धोका देशातल्या सर्वसामान्य नागरिकांकडून नाही, तर देशात समाजवादी आणि कम्युनिस्ट राजवट लादू इच्छिणाऱ्या कम्युनिस्टंमुळेच धोका आहे, असा स्पष्ट आरोप बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता. कम्युनिस्टांना बोलण्याचे वागण्याचे स्वातंत्र्य हवे. पण तेच स्वातंत्र्य इतरांना द्यायला त्यांची तयारी नाही. प्रसंगी राज्यसत्ता उलथून टाकण्याचे सुद्धा स्वातंत्र्य फक्त त्यांना हवे आहे असे टीकास्त्र आंबेडकरांनी सोडले होते.
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते :
– – कम्युनिस्ट पक्ष आणि समाजवादी पक्ष या दोन घटकांकडून संविधानावर मोठ्या प्रमाणात नापसंती व्यक्त करण्यात येत आहे. ते संविधानाच्या प्रती नापसंती का व्यक्त करतात? खरोखर संविधान वाईट आहे म्हणून ते नापसंती व्यक्त करतात काय? निश्चितपणे नाही, असे मी म्हणतो. कम्युनिस्ट पक्षाला कामगारांच्या हुकुमशाही तत्त्वांवर आधारलेले संविधान हवे आहे. पण हे संविधान सांसदीय लोकशाहीवर आधारित असल्यामुळे ते संविधानाचा निषेध करतात.
– समाजवाद्यांना दोन गोष्टी हव्या आहेत. पहिली गोष्ट त्यांना हवी आहे ती अशी की, ते जर सत्तारुढ झाले तर मोबदला न देता खाजगी संपत्तीचे राष्ट्रीयीकरण किंवा सामाजीकरण करण्याचे संविधानाने त्यांना स्वातंत्र्य दिलेच पाहिजे. समाजवाद्यांना पाहिजे असलेली दुसरी गोष्ट अशी की, संविधानातील मुलभूत अधिकार निरपेक्ष आणि कोणत्याही निर्बधाशिवाय असावे जेणेकरुन त्यांच्या पक्षाला सत्ता प्राप्त करण्यात अपयश आले तर, केवळ अनिर्बंध टीका करण्याचेच नव्हे तर राज्य उलथून पाडण्याचेही स्वातंत्र्य त्यांना हवे आहे.
कम्युनिस्ट आणि समाजवाद्यांच्या संविधान विषयाची बाबासाहेबांनी अशी परखड चिकित्सा केली. याचा संदर्भ बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणाच्या तिसऱ्या खंडात मिळतो. बाबासाहेबांची ही भाषणे शासनानेच प्रसिद्ध केली. त्यामुळे आज कम्युनिस्ट आणि काँग्रेस किंवा बाकीच्या विरोधकांनी संविधानाला धोका असल्याचा किंवा बदलाचा कितीही आणि कसाही narrative चालविला असला तरी प्रत्यक्षात बाबासाहेबांनी त्याच कम्युनिस्ट आणि समाजवाद्यांना संविधान सभेत तडाखे लावले होते, हेच स्पष्ट होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App