“पुरोगामीत्वा”च्या स्वलिखित नोंदी; रामविरोधाच्या “ऐतिहासिक चुकीची” कबुली!!

अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिरात श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण श्रीराम जन्मभूमी ट्रस्टने देशातल्या सर्व महत्त्वाच्या पक्षांच्या महत्त्वाच्या नेत्यांना पाठवून श्री रामलल्लांचे सर्वगामित्व अधोरेखित केले. श्री रामलल्ला कोणत्याही एका पक्षाचे, गटाचे अथवा समुदायाचे नाहीत, तर ते अखिल भारत वर्षाचे किंबहुना अखिल जगाचे प्रिय दैवत आहेत,असाच यातून संदेश देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच ट्रस्टने श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण केवळ भारतातच नव्हे, तर तब्बल 55 देशांमधल्या विविध मान्यवरांना पाठविले आहे. हेच श्री रामरल्लांचे खऱ्या अर्थाने सर्वगामित्व आहे. याची ऐतिहासिक नोंद श्रीराम जन्मभूमीने ट्रस्टने सर्वांना निमंत्रण पाठवून केली आहे.

पण त्या उलट श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे निमंत्रण नाकारून मात्र काँग्रेस सह सर्व विरोधी पक्षांनी आपल्या “पुरोगामीत्वा”ची नोंद करताना आपण रामविरोधात गेल्याची “ऐतिहासिक कबुलीच” स्वलिखित पत्रातून देऊन टाकली. कारण श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे निमंत्रण नाकारताना काँग्रेस सह प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी ट्रस्टचे सचिव चंपत राय अथवा अन्य पदाधिकाऱ्यांना आपापल्या लेटरहेडवर पत्र लिहून आपली अनुपस्थिती कळविली आहे आणि त्याचवेळी त्याची सविस्तर कारणे या पत्रांमधून दिली आहेत. या कारणांचा लघुत्तम साधारण विभाजक म्हणजे “लसावि” काढायचा झाला, तर श्रीराम जन्मभूमी मंदिरात श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने “कब्जा” केला आहे. ते त्यांचे निवडणुकीचे “गिमिक” आहे. त्यांना सोहळ्यातून स्वतःचे राजकारण साधायचे आहे. त्यामुळे आम्हाला त्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होता येणार नाही. सबब आम्ही त्या सोहळ्यात सहभागी होणार नाही, असे सर्व विरोधी पक्षीय नेत्यांनी पत्रामध्ये नमूद केले आहे.



नेमके हेच तर संघ आणि भाजप परिवाराचे “राजकीय जाळे” आहे आणि त्या जाळ्यात काँग्रेस सारख्या मुरब्बी पक्षासह बाकीच्या सर्व विरोधी पक्षांचे तथाकथित बडे नेते अडकून पडले आहेत. श्रीराम लल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा संघ आणि भाजपने आपल्या “ताब्यात” घेतल्याचा या सगळ्या नेत्यांनी पत्रातून आरोप केला आहे. पण मूळात तो सोहळा त्यांना “ताब्यात” कोणी घेऊ दिला??, हा कळीचा सवाल आहे. आता निमंत्रण देऊनही इतर कोणतेही पक्ष त्या सोहळ्यात हजरच राहणार नसतील, तर तो सोहळा आपोआपच संघ आणि भाजपच्या “ताब्यात” जाईल हे सांगायला अन्य कुठल्या संशोधनाची गरज आहे का??

उदाहरणच द्यायचे झाले, तर सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, अधीर रंजन चौधरी, ममता बॅनर्जी, शरद पवार, नितीश कुमार, लालूप्रसाद यादव, सीताराम येचुरी, प्रकाश आंबेडकर आदी नेते त्या सोहळ्याला उपस्थित राहिले असते, तर त्यांच्यावर जगभरातल्या प्रसार माध्यमांचे लक्ष गेलेच असते ना!!, त्यांना माध्यमांसमोर आपली भूमिका अयोध्येत जाऊन मांडता आलीच असती ना…!!, की माध्यमे त्यांना दुर्लक्ष करून टाळून पुढे जाऊ शकली असती??, हा सवाल आहे आणि या सवालाचे उत्तर नकारार्थी आहे. कारण हे सगळे विरोधी पक्ष नेते आपापल्या पक्षांचे बडे नेते आहेत आणि म्हणूनच त्यांना राम जन्मभूमी ट्रस्टने निमंत्रण पाठविले आहे, त्यामुळे आपोआपच प्रसार माध्यमांचा “प्रकाश” या नेत्यांवर त्या सोहळ्यात पडलाच असता, किंबहुना माध्यमांना त्यांच्यावर “प्रकाश” टाकावाच लागला असता!!… म्हणजेच तो सोहळा संपूर्णपणे संघ आणि भाजपच्या “ताब्यात” जाण्यापासून आपोआपच रोखता आला असता!!

मग भले राम जन्मभूमी ट्रस्टने या नेत्यांना त्यांच्या विशिष्ट प्रोटोकॉल नुसार अथवा सन्मानानुसार जिथे कुठे बसायचे असते किंवा बसवले नसते, तरी या नेत्यांवरचा प्रसार माध्यमांचा “प्रकाश” हटण्याची सुतराम शक्यता नव्हती. त्यामुळे श्री रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळा फक्त संघ आणि भाजपचा आहे, असे सांगण्यास बिलकुलच वाव उरला नसता. उलट तो सोहळा खऱ्या अर्थाने सर्वपक्षीय आणि सर्व समाज समूहांचा ठरला असता!!

आता देखील वर उल्लेख केलेल्या सर्व नेत्यांनी सोहळ्यास उपस्थित राहण्याविषयी असमर्थता व्यक्त केल्याने तो सोहळा कदाचित सर्वपक्षीय होणार नाही, पण तो सर्व समाज समूहांचा झाल्याशिवाय देखील राहणार नाही. कारण सर्व समाज समूहांच्या प्रतिनिधींना राम जन्मभूमी ट्रस्टने सोहळ्याचे निमंत्रण दिलेच आहे आणि ते सगळे समाज समूह प्रतिनिधी यास त्या सोहळ्याला उपस्थित राहणारच आहेत.

एकूण राम जन्मभूमी सोहळ्यास उपस्थित राहण्यास नकार देऊन काँग्रेस सह सर्व विरोधकांनी हात दाखवून अवलक्षणच करून घेतले आहे, पण त्यापलीकडे राम जन्मभूमी ट्रस्टच्या निमंत्रणाला उत्तर देताना जे पत्र पाठविले आहे, त्या पत्रातून त्यांनी स्वतःच्या तथाकथित “पुरोगामीत्वावर” शिक्कामोर्तब करताना आपण राम जन्मभूमीच्या सर्वसमावेशक सोहळ्याला विरोध केला होता आणि परिणामी तो थेट रामाचाच विरोध ठरला होता, या ऐतिहासिक चुकीच्या पुराव्याची नोंद त्यांनी स्वहस्ते श्रीराम जन्मभूमी ट्रस्टकडे पत्र पाठवून करवून दिली आहे!!

While proving self proclaimed progressiveness opposition leaders proved themselves RamVirodhi!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub