श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवला, वक्तव्यावर खुलासा देताना शिवराज पाटलांनी पत्रकारांनाच झापले

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जिहाद शब्द फक्त कुराण अथवा इस्लामला जोडायची गरज नाही. श्रीमद्भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश करताना त्याला जिहाद शिकवला, असे वक्तव्य माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी केल्यानंतर देशभरात संताप उसळला. या नंतर त्यांनी आपल्या वक्तव्याबाबत खुलासा केला आहे. मात्र तो खुलासा करतानाही “यु स्टॉप टॉकिंग नाऊ”, असे म्हणत त्यांनी पत्रकारांना झापले आहे. While giving clarification on the statement, Shivraj Patal surprised the journalists

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या मोहसीना किडवाई यांनी लिहिलेल्या एका पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलताना शिवराज पाटील यांनी कुरान शरीफचा संदर्भ देत जिहाद फक्त कुराणच शिकवतो असे नाही, तर श्रीमद्भगवद्गीता, ख्रिश्चनांचे बायबल हेही एक प्रकारे जिहाद शिकवतात असे वक्तव्य केले होते. त्यावरून देशभरात मोठा संताप उसळला. अनेक संघटनांनी शिवराज पाटलांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला.

या संदर्भात खुलासा करताना शिवराज पाटील यांनी कुराण हातात घेऊन आपण असे कोणतेही वक्तव्य केलेच नसल्याचा दावा केला. त्यावेळी त्यांनी पत्रकारांवरच आक्षेप घेतला. श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद करायला सांगितला असे तुम्ही म्हणाल का??, असा उलटा सवाल त्यांनी पत्रकारांना केला आणि अर्जुनाने श्रीकृष्णाने गीतेत अर्जुनाला जिहादचा उपदेश केल्याचे तुम्हीच म्हटले आहे, मी नव्हे, असे ते पत्रकारांना म्हणाले. मध्येच एका पत्रकाराने काही प्रश्न उपस्थित केल्यानंतर, “यू स्टॉप टॉकिंग नाऊ”, असे म्हणत त्याला गप्प केले. एएनआय वृत्तसंस्थेने शिवराज पाटील यांच्या खुलाशाचा व्हिडिओ जारी केला आहे.

While giving clarification on the statement, Shivraj Patal surprised the journalists

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात