काँग्रेस थेट पाकिस्तानकडून आदेश घेत आहे का? असा सवालही यावेळी केला.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Sambit Patra भाजप खासदार संबित पात्रा म्हणाले की, काँग्रेस आणि गांधी कुटुंब कधीही दहशतवादाला गांभीर्याने घेत नाही. जेव्हाजेव्हा देशावर हल्ला होतो तेव्हा काँग्रेस पुरावे मागते. पंतप्रधानांच्या ५६ इंचाच्या छातीबद्दल प्रश्न विचारले जातात, अशा विधानांमुळेच सैन्याचे मनोबल खचते. त्याचा फायदा पाकिस्तानला होतो.Sambit Patra
तसेच, काँग्रेस पाकिस्तानच्या सैन्याला आणि दहशतवाद्यांना ऑक्सिजन देते. दररोज एक काँग्रेस नेता बाहेर पडतो आणि पाकिस्तानच्या समर्थनार्थ काही ना काही बकवास करतो.
चरणजित सिंह चन्नी यांच्या विधानावर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट केली. ते म्हणाले की, राहुल गांधींची काँग्रेस पाकिस्तान आणि दहशतवादाचे समर्थन करत राहते. आता चरणजित सिंग चन्नी यांनी आपल्या सैन्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. या महत्त्वाच्या वेळी काँग्रेस आपल्या सैन्याचे मनोबल का कमी करत आहे? काँग्रेस थेट पाकिस्तानकडून आदेश घेत आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर, काँग्रेस नेते चरणजीत सिंह चन्नी यांनी २०१६ मध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितले आहेत. ते म्हणाले की, जर आपल्या देशात बॉम्ब पडला तर आपल्याला काय होईल हे कळणार नाही. आम्ही पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक केला असे म्हटले जाते, पण काहीही झाले नाही. सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही. कोणालाही कळले नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App