उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती; अयोध्या दौऱ्यावरून विरोधकांच्या टीका, टिप्पणीलाही दिलं आहे प्रत्युत्तर
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अयोध्येत पोहचले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ते रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत. त्या अगोदर ते जेव्हा लखनऊ विमानतळावर दाखल झाले तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. What Sharad Pawar says I have nothing to do with him Devendra Fadnavis
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘’मला अतिशय आनंद आहे, की रामल्लांचं दर्शन घेण्यासाठी मला या ठिकाणी येता आलं. खूप दिवसांची इच्छा होती. आज आमची केंद्रीय निवडणूक समितीची बैठकही होती, तरीही मी हा विचार केला की आपण अगोदर दर्शन घेऊ आणि मग दिल्लीला जाऊयात. कारण, रामजन्मभूमीच्या आंदोलनाशी मी जुडलेला होतो. प्रत्येक कारसेवेला मी हजर होतो. त्यामुळे या भूमीशी खूप आठवणी माझ्या जुडलेल्या आहेत. म्हणून मला अतिशय मनापासून आनंद आहे, की आज मला या ठिकाणी येता आलं.’’
जेव्हा फडणवीस दस्तूरखुद्द शरद पवारांची बाजू घेतात आणि काँग्रेसला सुनावतात…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अयोध्या दौऱ्यावरून विरोधकांकडून टीका,टिप्पणी सुरू आहे. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, ‘’विरोधकांचं कामच टीका करणं आहे, त्यांना कदाचित आस्था नसेल आम्हाला आस्था आहे. प्रभू श्रीराम हे एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी राज्यकारभार कसा चालवावा हे आपल्याला सांगितलं. गांधीजींची संकल्पना काय होती, ती रामराज्याची संकल्पना होती. मग रामराज्याची संकल्पना जर राबवायची असेल, तर रामाचं दर्शन तर घेतलंच पाहिजे.’’
याशिवाय स्वातंत्र्यवीर सावरकरांची हिंदूराष्ट्र ही भूमिका आम्हाला मान्य नाही, असं शरद पवारांनी म्हटलं आहे. यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, ‘’ते काय म्हणतात मला त्याच्याशी काही देणंघेणं नाही. आम्हाला मान्य आहे आणि आमचं हे म्हणणं आहे, की शेवटी भारतात बहुसंख्य हिंदू राहतात त्यामुळे तुम्ही याला हिंदू राष्ट्र म्हणा किंवा म्हणू नका, हे हिंदू राष्ट्रच आहे.’’
आज तुमच्यासोबत शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत आणि बाळासाहेबांचं स्वप्न होतं की राम मंदिर व्हावं, आज पुन्हा ती नैसर्गिक युती झालेली आहे आणि भाजपा सोबत शिवसेना आहे, काय वाटतं? या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना फडणवीसांनी सांगितले की, ‘’शंभर टक्के नैसर्गिक युती आहे, बाळासाहेबांच्या विचारांची जी शिवसेना आहे ती आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. वारसा हा जन्माने नाही तो विचाराने मिळतो, हेच एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिलं आहे.’’
कुणाला काय वाटते, याच्याशी आम्हाला काय करायचे?वीर सावरकरांची भूमिकाच आम्हाला मान्य आहे.भारतामध्ये बहुसंख्य हिंदू राहतात, त्यामुळे तुम्ही याला हिंदूराष्ट्र म्हणा किंवा म्हणू नका…हे हिंदूराष्ट्रच आहे!॥ जय श्रीराम ॥ लखनौ येथे माध्यमांशी संवाद….#Lucknow #UttarPradesh… pic.twitter.com/dyCetsBIWX — Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) April 9, 2023
कुणाला काय वाटते, याच्याशी आम्हाला काय करायचे?वीर सावरकरांची भूमिकाच आम्हाला मान्य आहे.भारतामध्ये बहुसंख्य हिंदू राहतात, त्यामुळे तुम्ही याला हिंदूराष्ट्र म्हणा किंवा म्हणू नका…हे हिंदूराष्ट्रच आहे!॥ जय श्रीराम ॥ लखनौ येथे माध्यमांशी संवाद….#Lucknow #UttarPradesh… pic.twitter.com/dyCetsBIWX
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) April 9, 2023
याचबरोबर काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकात्मक ट्वीटला रीट्वीट करून काँग्रेसवर निशाणा साधल्याबद्दल फडणवीसांनी खुलासा करताना सांगितले की, ‘’माझं ट्वीट जर तुम्ही वाचलं, मी एवढंच म्हटलं आहे की ३५ वर्षे शरद पवार हे काँग्रेससोबत आहेत आणि ज्या खालच्या स्तरावर काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांचा उल्लेख केलेला आहे. ज्याप्रकारे त्यांची संभावना केलेली आहे, ते योग्य नाही एवढच मी सांगितलं.’’
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App