कपिल सिब्बल जे बोलले, ते राजकीय सत्यच!!; पण…

कपिल सिब्बल मुंबईत येऊन जे बोलले, ते राजकीय सत्यच होते आणि आहे. पण ते म्हटल्यानुसार “जसेच्या तसे” घडवायची जबाबदारी संबंधित पक्षांवर आहे का??, हा खरा सवाल आहे. काय म्हणाले, कपिल सिब्बल?? ते म्हणाले, तुम्ही भाजपबरोबर गेलात, तर तुम्हाला सत्ता मिळेल. सत्तेचे लाभही मिळतील, पण तुमचे राजकीय भवितव्य धोक्यात आलेले असेल. तुम्हाला राजकीय भवितव्य शिल्लकच उरणार नाही. कारण भाजप त्याच्याबरोबर आलेल्या मित्र पक्षांना राजकीय भवितव्य शिल्लक ठेवत नाही. अजित पवारांनी भाजपबरोबर जाऊन चूक केली त्यांना सत्तेचे लाभ मिळाले पण त्यांना राजकीय भवितव्य नाही.

कपिल सिब्बल हे राजकीय सत्यच बोलले. पण मूळात ते ज्या काँग्रेस पक्षाचे सदस्य होते, त्या काँग्रेस पक्षाने प्रादेशिक पक्षांच्या बाबतीत नेमकी काय केले होते?? काँग्रेस ज्यावेळी सत्तेवर होती, त्यावेळी इतर प्रादेशिक पक्षांचे सहकार्य घ्यायचेच नाही, हा तर सोनिया गांधींनी पचमढीच्या अधिवेशनात “पण” केला होता. त्यावेळी प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व काँग्रेसला टोचत आणि बोचतच होते. पण नंतर काँग्रेसने सत्तेसाठी प्रादेशिक पक्षांना जवळच केले होते. काँग्रेसने आतापर्यंतच्या सर्व काळातल्या सत्तांमध्ये प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांचा वापरच करून घेतला. वापर संपल्यानंतर त्यांना बाजूलाच फेकले होते. ही उदाहरणे फार जुन्या इतिहासात तपासण्याची गरज नाही. जरा इंदिरा गांधींच्या राजकीय चरित्राचा आढावा घेतला किंवा राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्या राजकीय चरित्राचा आढावा घेतला, तर तशी उदाहरणे अनेक सापडतील.

काँग्रेसवाल्यांनी काय केले??

काँग्रेसने एकेकाळी सत्तेसाठी जवळ केलेला शेतकरी कामगार पक्ष आज कुठे आहे?? कम्युनिस्ट पार्टीची काय अवस्था झाली आहे?? याच कम्युनिस्टांनी इंदिरा गांधींचे सरकार 1967 पासून अनेकदा तारले होते. ते कम्युनिस्ट संपूर्ण देशातून संपले. जम्मू-काश्मीर मधल्या प्रादेशिक पक्षांशी राजीव गांधींनी युती आणि आघाडी केली होती. ते प्रादेशिक पक्ष आज अस्तित्वापुरते तरी शिल्लक आहेत का?? हा कळीचा मुद्दा आहे. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रात शेतकरी कामगार पक्षाचे नेते फोडून काँग्रेसमध्ये आणले होते. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे व्यापक हित डोळ्यासमोर ठेवून आपण एकत्र काम करूया असे सांगून “बेरजेचे राजकारण” केले होते, अशी माखलाशी यशवंतरावांच्या अनेक समर्थकांनी केली होती. त्यावेळी प्रादेशिक पक्षांच्या राजकीय भवितव्याची कुणी चर्चा केली नव्हती.

– प्रादेशिक नेते भाजपला चिकटायला का जातात??

प्रादेशिक पक्षांना संपविण्याचे काम भाजप करतो असे बोल कपिलशीत बोल यांनी भाजपला लावले, पण त्यांनी काँग्रेसला “तसे” बोल का नाही लावले?? वास्तविक काँग्रेस किंवा भाजपच्या सत्तेचे लाभ घेण्याची प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांना स्वतःलाच लालसा आहे. पण तसे सत्तेचे लाभ देण्याची जबाबदारी काँग्रेसची नाही आणि भाजपची सुद्धा नाही. पण प्रादेशिक पक्षांचे नेतेच सत्तेचे लाभ घेण्यासाठी काँग्रेस किंवा भाजपच्या जवळ जातात ही पण वस्तुस्थिती आहे. ती कशी नाकारता येईल?? कुठल्याही प्रादेशिक पक्षाला काँग्रेस किंवा भाजपने सत्तेचे लाभ दिले म्हणून त्या प्रादेशिक पक्षांच्या राजकीय अस्तित्वाची जबाबदारी काँग्रेस किंवा भाजपची आहे, असे कसे मानता येईल?? काँग्रेस किंवा भाजप हे काय प्रादेशिक पक्षांचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी राजकारणात आलेत काय?? ते तर स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारणात आलेत, मग त्यांनी स्वतःचे स्वार्थी राजकारण साधून घेतले तर त्यात गैर काय?? प्रादेशिक पक्षांचे नेते तरी दुसरे कुठले राजकारण करतात?? ते प्रादेशिक अस्मितांचे फक्त फुगे हवेत सोडतात, पण स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थाचे राजकारण करतात, म्हणून तर ते काँग्रेस किंवा भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जातात.

– “ती” जबाबदारी काय भाजपचे आहे का??

मग त्यांचे राजकीय भवितव्य टिकवून ठेवण्याची जबाबदारी काय भाजप किंवा काँग्रेसची आहे का?? ती जबाबदारी त्यांची स्वतःचीच आहे आणि त्यासाठी त्यांनीच कष्ट आणि काम केले पाहिजेत, हे प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांना समजत नाही का आणि समजत असेल, तर ते काँग्रेस किंवा भाजपची साथ सोडून स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी वेगळ्या संघर्ष का करत नाहीत?? हा खरा सवाल आहे. पण तो कपिल सिब्बल यांनी बिलकुल केला नाही. त्यांनी फक्त भाजपवर दुगाण्या झोडणे पसंत केले.

आपल्या वकिली बाण्यानुसार कपिल सिब्बल यांनी “आर्ग्युमेंट” भारी केले, पण ते अर्धवट आणि अर्धसत्य ठरले.

What Kapil Sibal said is indeed a political truth!! But…

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात