प्रतिनिधी
नाशिक – कोविडचे रिपोर्टिंग करताना परदेशी माध्यमांनी भारतीय नकारात्मकतेला प्राधान्य दिले, असे प्रतिपादन ऑर्गनायझरचे संपादक प्रफुल्ल केतकर यांनी केले. नाशिकच्या शंकराचार्य न्यास, सिंधुताई मोगल संदर्भ ग्रंथालय आणि विश्व संवाद केंद्र पुणे यांच्यातर्फे देवर्षी नारद जयंतीचे औचित्य साधून कोरोना महामारी आणि प्रसारमाध्यमे या विषयांवर त्यांनी संवाद साधला. western media reporting posed negative immage of india during covid 19 period, allaged praful ketkar
श्री. केतकर यांनी दिल्लीतील एका डेटा कलेक्शन संस्थेचे उदाहरण दिले. ते म्हणाले, की या संस्थेने पश्चिमेतील मोठ्या राष्ट्रातील वर्तमानपत्रांच्या गेल्या १० – १२ महिन्यांतील ५५० बातम्या गोळ्या केल्या. त्याचे अध्ययन केले तर त्यांच्या लक्षात आले की, बीबीसी, गार्डियन, इकॉनिक्स, वॉशिंग्टन पोस्ट, न्युयॉर्क टाइम्स, सीएनएन अशा आघाडीच्या माध्यम समुहांनी ७६ टक्के बातम्या भारताच्या नकारात्मकतेच्या, भय उत्पन्न करणाऱ्या दिलेल्या आढळल्या. त्या फेक न्यूज नव्हत्या. पण त्या फेक नॅरेटिव्ह निर्माण करणाऱ्या आणि चुकीची धारणा उत्पन्न करणाऱ्या होत्या.
अजेंडा ड्रीव्हन पत्रकारिता
ते म्हणाले, अगदी अलिकडचे उदाहरण लक्षात घेता येईल की, गंगेच्या वाहत्या प्रवाहाबरोबर प्रेते वाहून आली. या बातमीतील फोटो हे आताचे नव्हते, ते सन २०१५, १६, १८ या वर्षातील होते. पण नावाजलेल्या वर्तमानपत्रांना असे वाटले नाही की, आपल्या बातमीदारांला संबंधीत ठिकाणी पाठवून खातरजमा करून घ्यावी किंवा त्यांनी तसे कष्टही घेतले नाहीत, यामागे भारतातील कुंभमेळा असो की गंगेच्या वाहत्या पाण्याबरोबर आलेली प्रेते असो, यात भारताला बदनाम करणे हे परदेशी माध्यमांचा दृष्टीकोन, व्यूहरचना (अजेंडा ड्रीव्हन) होती. याला वैचारिक पत्रकारिता म्हणत नाहीत. अजेंडा अगोदर ठरवायचा आणि त्यानुसार बातम्यांना प्रसिध्दी द्यायचे हा त्यांच्या उद्देश होता. किंबहुना त्यांनी त्यांच्या नियोजनानुसाच बदनामी केलेली दिसते.
चीन आणि चीनच्या प्रांतातून सुरु झालेली कोरोनाची महामारी त्यातून भारतात पहिल्या टप्प्यात सरकारची संवेदनशिलता आणि समाजाची सक्रीयता या दोन्हीच्या समन्यवयातून आपण ज्या पध्दतीने मात केली. दुसऱ्या टप्प्यात गाफील राहिलो त्यामुळे केसेसही वाढल्या,मुलभूत सोयीसुविधांअभावी नुकसान झाले. कोरोनाचे भयावह चित्र उभे करण्याऐवजी संवेदनशीलपणे सकारात्मक बातम्या जर पूर्ण समाजासमोर ठेवल्या तर त्यांचा चांगला परिणाम दिसतो. हे आपल्याला अनेक विषयातून पहायला मिळाले, असेही केतकर यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App