पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला झटका, एकमेव आमदारानेही साथ सोडली

अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थितीत बायरन बिस्वास यांनी केला तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

विशेष प्रतिनिधी

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभेतील काँग्रेसचे एकमेव आमदार बायरन बिस्वास यांनी सोमवारी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमध्ये (टीएमसी) प्रवेश केला. अशाप्रकारे  पश्चिम बंगालमधील काँग्रेसच्या एकमेव आमदारानेही पक्षाची साथ सोडली आहे. West Bengals only Congress MLA Byron Biswas joins TMC

सत्ताधारी पक्षाच्या जनसंपर्क अभियान ‘नवज्वार’ दरम्यान टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थितीत विश्वास यांनी पक्षात प्रवेश केला. मुर्शिदाबाद जिल्ह्यातील सागरदिघी मतदारसंघातील आमदार बिस्वास यांनी टीएमसीमध्ये प्रवेश केल्यानंतर बॅनर्जी म्हणाले की, राज्यातील सत्ताधारी पक्षाला विरोध करायचा की केंद्रातील भाजपाला विरोध करायचा हे काँग्रेसवर अवलंबून आहे.

पोटनिवडणूक जिंकल्यानंतर जवळपास तीन महिन्यांनी, बिस्वास पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील घाटाल भागात टीएमसीमध्ये सामील झाले आणि म्हणाले की “त्यांच्या विजयात काँग्रेसची कोणतीही भूमिका नाही”.

TMC ने ट्विट केले आहे की, “सागरदिघी येथील काँग्रेसचे आमदार बायरन बिस्वास जनसंजोग यात्रेदरम्यान अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थितीत आज आमच्यात सामील झाले. आम्ही त्यांचे तृणमूल काँग्रेस परिवारात मनापासून स्वागत करतो.”

West Bengals only Congress MLA Byron Biswas joins TMC

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub