वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील राजकीय हिंसाचाराच्या खटल्याच्या सुनावणीत न्यायमूर्तीच बदलण्याची मागणी ममता बॅनर्जी सरकारने एकीकडे केली आहे. तर दुसरीकडे सुप्रिम कोर्टात गेलेल्या एका खटल्याच्या सुनावणीतून न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांनी स्वतःहून माघार घेतली आहे. West Bengal post-poll violence: SC Judge Indira Banerjee recuses herself from hearing
पश्चिम बंगालमधील निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत अर्थात सीबीआय मार्फत सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करावी, अशी मागणी करणारी याचिका सुप्रिम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. त्यावर सुनावणी सुरू होताच या खटल्यातून माघार घेत असल्याचे न्या. बॅनर्जी यांनी जाहीर केले. मला या खटल्याची सुनावणी घेण्यात वैयक्तिक समस्या आहेत, असे न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांनी स्पष्ट केले. या पेक्षा त्यांनी कोणते अधिक स्पष्टीकरण दिले नाही. त्यानंतर खंडपीठातील दुसरे न्यायमूर्ती एम. आर. शहा यांनी या याचिकेची सुनावणी अन्य खंडपीठासमोर करण्याचा आदेश दिला.
बंगालमधील विश्वजित सरकार आणि स्वर्णलता अधिकारी यांनी ही याचिका दाखल केली आहे. सरकार यांचे मोठे बंधू आणि अधिकारी यांचे पती यांच्या हिंसाचारात हत्या झाल्या आहेत. या हत्या तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. या याचिकेच्या सुनावणीत सहभागी होण्यासाठी न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांनी नकार दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App