नाशिक : पश्चिम बंगाल पोलिसांची CID टीम ममतांच्या घरी; ममता गेल्या सोनियांच्या दारी!!, ही महत्वाची घडामोड आज घडली.West Bengal Police’s CID team visits Mamata’s house; Mamata goes to Sonia’s door!!
– CID ची टीम ममतांच्या घरी
पश्चिम बंगाल मध्ये विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान झालेल्या घोटाळ्यात संदर्भात चौकशी आणि तपास करण्यासाठी पश्चिम बंगाल पोलिसांची सीआयडी टीम आज ममता बॅनर्जींच्या कोलकत्या मधल्या घरी गेली. पण त्यावेळी ममता बॅनर्जी तिथे हजरच नव्हत्या. त्या त्यावेळी राजधानी नवी दिल्लीत होत्या. सीआयडीची टीम ज्यावेळी ममता बॅनर्जींच्या घरी पोहचली, त्यावेळी तिथे प्रचंड गर्दी जमली होती. ममता बॅनर्जींच्या गोटातले खासदार कल्याण बॅनर्जी तिथे गेले. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे भाजपचे सरकार सूडबुद्धीचे राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
मात्र त्याचवेळी ममता बॅनर्जी दिल्लीत सुरुवातीला अभिषेक बॅनर्जी यांच्या घरी पोहोचल्या. तिथे ममता आणि अभिषेक यांच्यात बरीच चर्चा झाली. त्यावेळी टीव्हीवर ममता बॅनर्जींच्या घरी सीआयडीची टीम पोहोचण्याच्या बातम्या चालत होत्या.
– ममता – सोनिया भेट
त्यानंतर काहीच वेळात ममता बॅनर्जी १०, जनपथ येथे सोनिया गांधींची भेट घेण्यासाठी गेल्या. वास्तविक कालच इंडी आघाडीच्या बैठकीत सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी शेजारी शेजारीच बसल्या होत्या. दोघींनी एकमेकींना मिठ्या देखील मारल्या. तो फोटो सगळीकडे व्हायरल झाला. पण ममता बॅनर्जी सोनिया गांधींना इंडिया आघाडीच्या बैठकीत मिठी मारून थांबल्या नाहीत. त्या आज सोनिया गांधींची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी गेल्या.
– ममतांचा राजकीय अहंकार
या त्याच ममता बॅनर्जी आहेत, ज्यांनी काळात पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या काळात सोनिया गांधींच्या काँग्रेसशी साधी आघाडी करायला सुद्धा नकार दिला होता. काँग्रेसने सांगितलेल्या कमीत कमी जागा सुद्धा द्यायला नकार दिला होता. ममता बॅनर्जीची तृणमूळ काँग्रेस पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढून हरली. पण ममतांनी काँग्रेसशी जुळवून घेतले नाही.
– ममता आल्या “जाग्यावर”
पण पराभव झाल्यानंतर मात्र मोठा बॅनर्जी “जाग्यावर” आल्या. त्यांना आपल्या घटलेल्या ताकदीची नीट जाणीव झाली. त्यांचे 59 आमदार आणि 20 खासदार त्यांना सोडून गेले. त्यांनी स्वतंत्र राजकीय चूल मांडली. त्याचवेळी ममता बॅनर्जी स्वतःच सीआयडी चौकशीच्या स्कॅनर खाली आल्या. त्याबरोबर ममता बॅनर्जी सोनिया गांधींच्या घरी त्यांच्या भेटीसाठी पोहोचल्या. दोघी एकमेकींकडे पाहून हसल्या. दोघींनी गप्पा मारल्या. याच्या सगळ्या बातम्या वृत्तसंस्थांनी दिल्या. पण त्यात ममता बॅनर्जी “जाग्यावर” आल्याचे कुणी म्हटले नाही.
West Bengal Police’s CID team visits Mamata’s house; Mamata goes to Sonia’s door!!
महत्वाच्या बातम्या
- TMC : साड्यांच्या ढिगाऱ्याखाली लपला TMC नेता! ‘कट मनी’ घोटाळ्याच्या आरोपांनंतर नाट्यमय कारवाई, व्हिडिओ व्हायरल
- Philippines : फिलिपिन्समध्ये 8.2 तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीचा इशारा जारी, किनारी भागांत सतर्कता
- Netanyahu : ट्रम्प यांच्या सूचनेकडे नेतान्याहूंचे दुर्लक्ष, इराणवर जोरदार हवाई हल्ला; मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा शिगेला
- पराभवाच्या खाल्ल्यावर लाथा; INDI आघाडीच्या बैठकीत मारल्या मिठ्या!!