विशेष प्रतिनिधी
कोलकता : पश्चिम बंगालमधील राज्यपालांचा वाद आता संसदीय मंडळापर्यंत पोहोचला आहे. आता पर्यंत केवळ राजकीय टीका टिपण्णीपुरता मर्यादित असल्ल्या या वादाने आता पुढचा टप्पा गाठला आहे. राज्यपाल जगदीप धनकर यांच्याविरुद्ध आता विधानसभेचे अध्यक्ष बिमान बॅनर्जी यांनी थेट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडेच तक्रार केली आहे.West Bengal governor get in to contoversy
संसदीय लोकशाही आणि सभागृहाच्या कामकाजात धनकर अवास्तव हस्तक्षेप करतात अशी तक्रार त्यांनी केली आहे. ऑनलाइन पार पडलेल्या अखिल भारतीय सभापती परिषदेच्या व्यासपीठाचा बॅनर्जी यांनी वापर केला. ते म्हणाले की, सभागृहाने अनेक विधेयके मंजूर केली आहेत
मात्र राज्यपालांनी त्यावर स्वाक्षरीच केलेली नाही. बंगालच्या संसदीय लोकशाही इतिहासात असे याआधी कदापी घडले नव्हते.तृणमूल काँग्रेसच्या मते राज्यपाल एका विशिष्ट राजकीय पक्षाचे प्रतिनिधी असल्याप्रमाणे वागत आहेत. आम्ही दीर्घकाळापासून ही तक्रार करीत आहोत. ते राज्याच्या कारभारात ढवळाढवळ करीत आहेतच, पण बंगाल सरकारची प्रतिमा सुद्धा मलिन करीत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App