फॅक्टरीतून उठणारे आगीच्या लोळ आणि धूर पाहून लोक घाबरले.
विशेष प्रतिनिधी
मेदिनीपूर : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर इगरा येथून हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. येथील बॉम्ब बनवण्याच्या कारखान्यात मोठा स्फोट झाला आहे. या दुर्घटनात सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. Explosion in an illegal firecracker factory in Egra of East Midnapore has claimed six lives
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात जीव गमावणाऱ्यांची संख्या वाढू शकते. हा स्फोट इतका भीषण होता की संपूर्ण परिसर हादरला. फॅक्टरीतून उठणारे आगीच्या लोळ आणि धूर पाहून लोक घाबरले. घाईघाईत घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्ष व अग्निशमन दलाला देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच इगरा पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले.
तृणमूल काँग्रेसचे नेते भानू बाग यांच्या घरात हा स्फोट झाल्याचे पोलिसांच्या माहितीत उघड झाले आहे. कारखान्याच्या मागे काही देशी बॉम्ब बसवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मोठ्या आवाजात झालेल्या बॉम्बस्फोटांनी लोकांमध्ये घबराट पसरली. लोकांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता त्यांना घटनास्थळी जळालेले मृतदेह दिसला. जळालेले मृतदेह पाहून घाबरलेल्या लोकांनी पोलिसांना माहिती दिली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App