ये नंदिग्राम नहीं आसाँ इतना ही समझ लीजे
इक आग का दरिया है और डूब के जाना है !
विशेष प्रतिनिधी
नंदिग्राम:पश्चिम बंगालच्या दुसर्या टप्प्यातील मतदानाला सकाळी सुरुवात झाली. नंदीग्राममधील ममता बॅनर्जी आणि शुभेंदू अधिकारी ही सर्वात लक्षणीय लढत.यासाठी आज मतदान होतेय . ममता बॅनर्जी आणि शुभेंदू अधिकारी यांचं भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होईल. त्यासोबतच बंद होईल बंगालच भविष्य!West Bengal Election 2021: This ‘Nandigram’ will not come … Nandigram will decide the future of Bengal! Karbo ladbo jeetbo re …
नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी आणि शुभेंदू अधिकारी यांच्यात हाय-व्होल्टेज निवडणूक प्रचार झाला. ममता बॅनर्जी स्वत: 10 वर्षात पहिल्यांदाच कित्येक दिवस नंदीग्राममध्ये राहिल्या, तर अमित शाह यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी शुभेंदू अधिकारी यांच्या समर्थनार्थ प्रचार केला.
अधिकारी कुटूंब म्हणजे राजकारणातील जुने आणि प्रस्थापित खेळाडू . शिशिर, शिवेंदू, शुभेंदू हळूहळू मोठे नेते बनले आहेत.
शंतनू बॅनर्जी यांचे म्हणणे आहे की शुभेंदू अधिकारी यांनी नंदीग्राममध्ये तृणमूल संघटनेची स्थापना केली होती. ममता बॅनर्जी गेली दहा वर्षे मुख्यमंत्री आहेत, पण त्या कधीही नंदीग्राममध्ये आल्या नाहित. सर्व काही शुभेंदूंच्या खांद्यावर होतं.
आता शुभेंदू टीएमसी सोडून भाजपमध्ये दाखल झाले आहेत, त्यांच्याबरोबर स्थानिक टीएमसीतील 35 नेतेही गेले आहेत. लढत मनोरंजक आहे. नंदीग्राम कोणाचे ? हे पाहणे मजेशीर ठरणार आहे
सुफियाना शेख, अबू ताहेर आणि मेघनाथ पॉल. नंदीग्राममध्ये तृणमूलच्या शुभेंदू अधिकारी यांचे हे तीन राजकीय कमांडर होते. आता सुफियाना आणि ताहेर तृणमूलमध्ये आहेत.ते ममतांसोबत प्रचार करतात . तर मेघनाथ पाॅल शुभेंदू यांच्या बरोबर भाजप मध्ये आले आहेत. या तिघांची नंदीग्राममधील मतदारांमध्ये चांगलीच पोहच आहे. हे लक्षात घेऊन ममता बॅनर्जी यांनी पाॅल यांना मदत मागीतली होती. 30 टक्के मुस्लिम मतदार असणारे नंदीग्राम 2016 मध्ये शुभेंदू यांनी 68 हजार मतांनी जिंकले होते. टीम शुभेंदू असे गृहित धरून आहे की 30 टक्के मतदारांपैकी क्वचितच त्यांच्यासोबत असतील. त्यामुळे ते उघडपणे हिंदुत्वाचे कार्ड खेळत आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे नंदिग्राममध्ये तळ ठोकून राहिल्याने शुभेंदूच्या हिंदुत्व कार्डला बरीच शक्ती मिळाली आहे. भाजपाचे पश्चिम बंगालचे उपाध्यक्ष राजकमल पाठक यांचे म्हणणे आहे की ममतांसाठी नंदीग्राम जिंकणे फारसे सोपे नाही. पण दीपक सान्याल म्हणतात की शुभेंदूंना ममतांचा पराभव करणे सोपे नाही, कारण नंदीग्राममधील 70% टक्के हिंदू मतदार केवळ शुभेंदूंनाच मत देणार नाहीत. सान्याल म्हणतात की इतक्या मतदारांनी शुभेंदूला मत दिल्यास ममता नक्कीच निवडणूक हारतील . ममता बॅनर्जी या गेल्या दीड वर्षांपासून भाजपची रणनीती ओळखून स्वतः हिंदु विरोधी नसल्याचे आव आणत आहेत. त्या संपूर्ण बंगालमध्ये सॉफ्ट हिंदुत्वाचे कार्ड खेळत आहेत. ममतांनी त्यांचे गोत्र शांडिल्य आणि पक्षाचे गोत्र मा माटी मानुष म्हंटले आहे. सनातन धर्माच्या पुजार्यांसाठी राज सहायता घोषणेसह बरेच प्रयत्न केले गेले आहेत.
दुसरे म्हणजे सर्व तृणमूल मधील हिंदूंनी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला नाही. ज्येष्ठ पत्रकार शांतनु बॅनर्जी यांचे म्हणणे आहे की काहीही झाले तरी पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींसमोर राजकीय चेहरा म्हणून शुभेंदू अधिकारी कुठेही नाहीत. आणि ममता बॅनर्जी यांना ज्या पद्धतीने जनतेचा पाठिंबा मिळतोय त्यातून हे स्पष्ट दिसतं की , त्या अल्प फरकाने जिंकतील मात्र शुभेंदूंची जागा काढून घेतील.
शुभेंदूंचे वडील तृणमूलचे खासदार आणि आता ते भाजपमध्ये आहेत. शिशिर अधिकारी हे पंचायत निवडणुकीतील तळागाळातील नेते आहेत. महानगरपालिका ते संसदेपर्यंत त्यांनी आपल्या विजयाचे झेंडे रोवले आहेत . ते स्पष्टपणे सांगतात की हा परिसर आमचा आहे.
जर आमचा मुलगा निवडणूक लढवत असेल तर तो विजयी होईल. जनता ममता बॅनर्जी यांना जिंकवण्याच्या मनःस्थितीत नाही. 2 मे रोजी परिस्थिती स्पष्ट होईल. राज्यात पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर विश्वास ठेऊन लोक विकासासाठी भाजपला मतदान करतील. असो, भाजपने नंदीग्राम जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत.
भाजपने केंद्रीय मंत्री, नेते, इतर राज्यांचे नेते, संघ प्रचारक, कार्यकर्ते यांची फौज नंदीग्राममध्ये कामाला लावली आहे. रणनीतिकार सूत्र म्हणतात की या क्षणी आमचा हेतू नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींना घेरून त्यांचे मनोबल तोडणे असा आहे.
कारण त्यानंतर निवडणुकांचे अजून सहा टप्पे बाकी आहेत. नंदीग्राममधील पराभवाची स्थिती पाहून ममता बॅनर्जी कंटाळल्या, तर आम्हाला पुढे मोठा फायदा होऊ शकेल.
नंदिग्राम हे केवळ एक गाव किंवा एक मतदारसंघ नाही तर बंगालच्या राजकारणाच्या बदलाचं प्रतिक आहे. पश्चिम बंगालच्या इतिहासात नंदिग्रामला विशेष महत्त्व आहे. स्वातंत्र्याच्या आधी नंदिग्रामच्या आंदोलनाने ब्रिटीशांनाही हात टेकायला भाग पाडलं होतं. नंदिग्राममध्ये 2007 मध्ये सर्वात उग्र आंदोलन झालं होतं. 2007 च्या आंदोलनाचे नायक होते शुभेंदू अधिकारी .
ममतांचा एकेकाळचे उजवे हात समजले जाणारा शुभेंदू अधिकारी यांनी तृणमूलशी नातं तोडलं आणि ते भाजपमध्ये दाखल झाले . त्यामुळे तृणमूलचा आणि पर्यायाने शुभेंदू अधिकारी यांचा बालेकिल्ला समजलं जाणारं नंदिग्राम, यंदा कुणाला विजयाचा टिळा लावणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान काल नंदिग्राम येथे झालेल्या ममता बॅनर्जी यांच्या सभेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. सभेसाठी ममता बॅनर्जी ह्या तब्बल दिड तास घुटमळत होत्या मात्र गर्दी काही जमलीच नाही. यामुळे ममता बॅनर्जी काहीशा हताश झालेल्या दिसल्या .रिकामे स्टँड आणि पेंडॉल म्हणजे सत्तांतराचे संकेत तर नव्हेत !
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App