वृत्तसंस्था
कोलकाता : देशात मोदी सरकार आल्यानंतर असहिष्णुता निर्माण झाली. सरकारवर टीका करणाऱ्यांना करणाऱ्यांच्या मागे मोदी सरकारने केंद्रीय तपास संस्था लावल्या, अशा प्रकारचे आरोप करणाऱ्यांना पश्चिम बंगाल मधून “वेगळे उत्तर” मिळाले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीकास्त्र सोडणाऱ्या काँग्रेस प्रवक्त्याला अटकेचा फटका बसला आहे. प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते कौस्तव बागची यांना ममता बॅनर्जींच्या पोलिसांनी पहाटे 3.00 वाजता त्यांच्या घरातून उचलून नेऊन अटक केली आहे. West Bengal Cong spokesperson Kaustav Bagchi arrested for comments against Mamata Banerjee
बंगालमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीत सागरदिघी मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराने तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला. या मुद्द्यावरून सध्या काँग्रेस आणि तृणामूळ काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये राजकीय घमासान माजले आहे. सागरदिघीतील निकालामुळे संतापलेल्या ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि भाजप यांच्यावर षडयंत्र रचल्याचा आरोप करून त्यांच्याविरुद्ध आपण स्वबळावर रणशिंग फुंकणार असल्याचे जाहीर केले. कोणत्याही राजकीय पक्षाबरोबर युती अथवा आघाडी न करता बंगालमध्ये आणि देशात स्वबळावर निवडणूक लढविण्याचे आव्हान ममता बॅनर्जी यांनी स्वीकारले.
मात्र, हे आव्हान देताना आणि स्वीकारतानाच त्यांनी पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि लोकसभेतले काँग्रेसचे गट नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर वैयक्तिक टीका टिपणी केली होती. चौधरी यांच्या मुलीने आत्महत्या केली आहे. तिच्या आत्महत्येबाबत मी बोलायला लागले, तर काँग्रेसची अवस्था फार बिकट होईल असा धमकीवजा इशारा ममता बॅनर्जींनी दिला. या मुद्द्यावरून काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते कौस्तव बागची यांनी ममता बॅनर्जी अधीर रंजन चौधरींवर व्यक्तिगत हल्ला करत असल्याचा आरोप केला. त्यानंतर कौस्तव बागची यांना त्यांच्या 24 परगणा जिल्ह्यातील घरामधून पहाटे 3.00 वाजता उचलून पोलिसांनी अटक केली आहे.
– अटकेचे खरे कारण
मात्र कौस्तुव बागची यांच्या अटकेचे हे एकमेव कारण नाही. पश्चिम बंगालमधील निवृत्त आयएएस अधिकारी दीपक कुमार घोष यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर एक पुस्तक लिहिले आहे. “ममता बंधोपाध्याय के जमोन देखची” असे या पुस्तकाचे नाव आहे. या पुस्तकात 189 व्या पानावर ममता बॅनर्जी यांच्यावर लेखकाने काही वैयक्तिक टीका टिप्पणी केली आहे. ममता बॅनर्जी यांनी चॉकलेट सँडविच खाऊन उपोषण केल्याचा या पुस्तकात लेखकाने दावा केला आहे.
या पुस्तकाची सॉफ्ट कॉपी बंगाल मधल्या जनतेपर्यंत पोहोचविली पाहिजे. त्यामुळे ममता बॅनर्जींचा सगळा खरा चेहरा राज्यातल्या जनतेसमोर येईल आणि त्यांची पोलखोल होईल, असे वक्तव्य कौस्तुव बागची यांनी केले होते. त्यानंतर पश्चिम बंगाल पोलिसांनी कौस्तुव बागची यांना पहाटे 3.00 वाजता त्यांच्या घरातून उचलून अटक केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App